​‘पद्मावत’ पाठोपाठ कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’वरही वादाची लटकती तलवार! वाचा, संपूर्ण प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 04:30 AM2018-02-06T04:30:30+5:302018-02-06T10:18:31+5:30

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ला झालेला विरोध आपण सगळ्यांनी बघितला. एकक्षण तर हा चित्रपट प्रदर्शित होतो की नाही, अशी वेळ ...

Kangana Ranaut's 'Manikarnika' after the 'Padmaav' Read, the whole episode !! | ​‘पद्मावत’ पाठोपाठ कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’वरही वादाची लटकती तलवार! वाचा, संपूर्ण प्रकरण!!

​‘पद्मावत’ पाठोपाठ कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’वरही वादाची लटकती तलवार! वाचा, संपूर्ण प्रकरण!!

googlenewsNext
जय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ला झालेला विरोध आपण सगळ्यांनी बघितला. एकक्षण तर हा चित्रपट प्रदर्शित होतो की नाही, अशी वेळ आली. पुढे ऐनकेन प्रकारे हा चित्रपट रिलीज झाला. पण त्यासाठी भन्साळी आणि ‘पद्मावत’च्या संपूर्ण स्टारकास्टला अनेक संघर्षातून जावे लागले. ‘पद्मावत’नंतर आता बॉलिवूडचे अन्य चित्रपटही अशाच संघर्षाच्या तोंडावर आहेत. होय, ताजी बातमी खरी मानाल तर कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटालाही अशाच संघर्षाचा सामना करावा लागू शकतो.
या चित्रपटात कंगना राणौत राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच कंगणा व संपूर्ण टीम चित्रपटाच्या उर्वरित शूटींगसाठी राजस्थानच्या बिकानेरकडे रवाना होणार आहे. पण बिकानेरमध्ये शूटींग सुरू होण्याआधीच या चित्रपटावर संकटाचे ढग जमू पाहत आहेत. होय, राजस्थानच्या सर्व ब्राह्मण महासभा या सामाजिक संघटनेने या चित्रपटाच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’मध्ये राणी लक्ष्मीबाईचे प्रेमसंबंध दाखवण्यात आल्याचा दावा या संघटनेने केला असून याला विरोध म्हणून राजस्थानात या चित्रपटाचे शूटींग हाणून पाडण्याचा इशारा दिला आहे. सर्व ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’मध्ये ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यातून केला आहे. या चित्रपटात महाराणी लक्ष्मीबाईचे एका इंग्रज अधिकाºयासोबतचे प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’चे शूटींग त्वरित रोखण्यात यावे, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा इशारा या संघटनेने दिला आहे.
तूर्तास चित्रपटाच्या निर्मात्यांनी या वादावर कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे संघटनेच्या या इशाºयानंतर ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’चा वाद किती विकोपाला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

ALSO READ : ​कंगना राणौतला भासू लागली जोडीदाराची उणीव! पुढीवर्षी फेब्रुवारीत वाजणार सनई चौघडे!!
 

Web Title: Kangana Ranaut's 'Manikarnika' after the 'Padmaav' Read, the whole episode !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.