मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूवर काजोलने दिली 'ही' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:03 AM2018-09-18T11:03:42+5:302018-09-18T11:08:28+5:30

यावर्षी अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या अनेक दिवसांपासून काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन अनेक चर्चा रंगतायेत.

kajol give this reaction on her daughters bollywood debu | मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूवर काजोलने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूवर काजोलने दिली 'ही' प्रतिक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या काजोल तिचा आगामी सिनेमा 'हेलिकॉप्टर ईला'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेयात काजोल एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे

यावर्षी अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या अनेक दिवसांपासून काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन अनेक चर्चा रंगतायेत. सध्या काजोल तिचा आगामी सिनेमा 'हेलिकॉप्टर ईला'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी तिला मुलीच्या डेब्यू संदर्भात प्रश्न विचारण्यात आला, न्यासाला जर सिनेमात येण्याची इच्छा असेल तर काजोल तिला मदत करणार का? यावर काजोल म्हणाली तिला बॉलिवूडमध्ये काम करायचे असेल तर मी नक्कीच तिला प्रोत्साहान देईन. याच बरोबर काजोलने हे दखील स्पष्ट केले की ती आपले विचार मुलीवर थोपवत नाही. 


काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न अजय देवगणला विचारण्यात आला होता, ''त्यावेळी अजयने स्पष्ट केले होते की त्याची मुलगी सिनेमांविषयी बोलत नाही. सध्या ती तिचं शैक्षणिक आयुष्य एन्जॉय करतेय.'' न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिकतेय. 


लवकरच काजोलचा 'हेलीकॉप्टर ईला' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात काजोल एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे जिची गायिका होण्याची इच्छा असते. आई- मुलाच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. 'हेलीकॉप्टर ईला' ही एक मॉर्डन आई आणि तिच्या एकुलत्या एक मुलाची हटके कहाणी आहे, जी आपल्या प्रत्येकाच्य आयुष्याच्या फार जवळची वाटते. जबाबदार आईबरोबरच एका महत्वाकांक्षी गायिकेच्या रुपात काजोलला या सिनेमात पाहता येणार आहे. या गंभीर आणि नाजूक विषयाला अत्यंत मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. यात काजोल, रिद्धिसोबत नेहा धूपियाचीही महत्त्वाची भूमिका आहे. 'हेलिकॉप्टर ईला' हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधरित आहे. मितेश शाह द्वारा लिखित अजय देवगण आणि पेन इंडियाद्वारा या सिनेमाची निर्मीती करता येणार आहे.   

Web Title: kajol give this reaction on her daughters bollywood debu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.