John Abraham Birthday : करोडोची कमाई करणाऱ्या जॉन अब्राहमकडे आहेत इतक्या बाइक्स आणि गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:36 PM2018-12-17T12:36:23+5:302018-12-17T12:44:20+5:30

धुम या चित्रपटामुळे जॉन नावारूपाला आला. या चित्रपटातील त्याच्या बाईक्सची चांगलीच चर्चा झाली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात देखील जॉनला बाईक प्रचंड आवडतात.

John Abraham Birthday: john abraham bike and car collection | John Abraham Birthday : करोडोची कमाई करणाऱ्या जॉन अब्राहमकडे आहेत इतक्या बाइक्स आणि गाड्या

John Abraham Birthday : करोडोची कमाई करणाऱ्या जॉन अब्राहमकडे आहेत इतक्या बाइक्स आणि गाड्या

googlenewsNext
ठळक मुद्देजॉनच्या बाईक कलेक्शनमध्ये यामाहा आर 1, कावासकी निंजा, डुकाती डिवेल, सुजुकी हायाबुसा, महिंद्रा मोजो यांसारख्या अनेक महागड्या बाईक्स आहेत. त्याच्या यामाहा व्हीएमएक्स या बाईकची किंमत तर 29 लाख रुपये आहे.तसेच ऑडी क्यू 3, ऑडी क्यू 7, लॅम्बोर्गिनी गॅलार्डो, निसान जीटीआर, मारुती जिप्सी अशा देखील गाड्या त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत. 

जॉन अब्राहमचा आज म्हणजेज 17 डिसेंबरला वाढदिवस असून त्याचे सगळे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले आहे. त्याने जय हिंद कॉलेजमधून बॅचलर डिग्री घेतली आहे. तसेच त्याने एमबीए केले आहे. जॉन हा उच्चशिक्षित असला तरी त्याला नोकरी करण्याची आवड नव्हती. त्याने कॉलेज जीवनातच मॉडलिंगला सुरुवात केली होती. त्याने त्याच्या करियरच्या सुरुवातीला एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. त्यानंतर तो मीडिया प्लानर म्हणून काम करत होता. 1999 मध्ये ग्लॅडरस मॅनहंड कॉन्स्टेस्टचा तो उपविजेता ठरला आणि त्याचे संपूर्ण करियरच बदलले. त्यानंतर पंकज उदास, बाबूल सुप्रियो यांसारख्या प्रसिद्ध गायकांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये त्याला चमकण्याची संधी मिळाली. 

जॉनने जिस्म या चित्रपटापासून त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीली सुरुवात केली. या चित्रपटातील त्याचे काम समीक्षकांना चांगलेच आवडले. पण त्यानंतर आलेल्या साया या चित्रपटाने समीक्षकांची निराशा केली. यानंतर त्याने पाप, लकीर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला यश मिळाले नाही. मात्र यश राज फिल्मसच्या धुम या चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

जॉन आता अभिनेता असण्यासोबतच निर्मिता देखील आहे. त्याने निर्मिती केलेल्या विकी डोनर या चित्रपटाची तर चांगलीच चर्चा झाली होती. पाच कोटीचे बजेट असलेल्या या चित्रटाने 50 कोटींहून अधिक बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केले होते. तसेच त्याने मद्रास कॅफे, रॉकी हँडसम, फोर्स टू, परमाणू यांसारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नेटवर्थियर या बेवसाईटनुसार जॉनकडे आजच्या घडीला 355 कोटीहून अधिक प्रॉपर्टी आहे. त्याचे घरच 5000 स्केअर फूटचे असून ते सी फेसिंग आहे. 

जॉन अब्राहम एका चित्रपटात काम करण्यासाठी 15 कोटी घेतो. तसेच अनेक महत्त्वाच्या ब्रँड्सची तो जाहिरात करतो. यासोबतच तो एक निर्माता आहे. त्याला स्टॉक मार्केटऐवजी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला अधिक आवडते. त्यामुळे त्याने मुंबईतील वांद्रे आणि खार अशा दोन ठिकाणी घरे घेतली आहेत. एवढेच नव्हे तर पुण्यात त्याचे फिटनेस सेंटर आहे. 

धुम या चित्रपटामुळे जॉन नावारूपाला आला. या चित्रपटातील त्याच्या बाईक्सची चांगलीच चर्चा झाली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात देखील जॉनला बाईक प्रचंड आवडतात.

जॉनच्या बाईक कलेक्शनमध्ये यामाहा आर 1, कावासकी निंजा, डुकाती डिवेल, सुजुकी हायाबुसा, महिंद्रा मोजो यांसारख्या अनेक महागड्या बाईक्स आहेत. त्याच्या यामाहा व्हीएमएक्स या बाईकची किंमत तर 29 लाख रुपये आहे. तसेच ऑडी क्यू 3, ऑडी क्यू 7, लॅम्बोर्गिनी गॅलार्डो, निसान जीटीआर, मारुती जिप्सी अशा देखील गाड्या त्याच्या कलेक्शनमध्ये आहेत. 

Web Title: John Abraham Birthday: john abraham bike and car collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.