जान्हवी कपूर करणार ‘हॉरर-कॉमेडी’! ‘रूहअफ्जा’मध्ये झाली एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 11:03 AM2019-03-29T11:03:03+5:302019-03-29T11:04:19+5:30

श्रीदेवी-बोनी कपूरची लाडकी लेक आणि ‘धडक’ स्टार जान्हवी कपूरने तिच्या करिअरचा चौथा सिनेमा साईन केलाय. होय, या चौथ्या चित्रपटात जान्हवी राजकुमार राव आणि वरूण शर्मासोबत धम्माल करताना दिसणार आहे.

janhvi kapoor joins rajkummar rao varun sharma in roohafza |    जान्हवी कपूर करणार ‘हॉरर-कॉमेडी’! ‘रूहअफ्जा’मध्ये झाली एन्ट्री!!

   जान्हवी कपूर करणार ‘हॉरर-कॉमेडी’! ‘रूहअफ्जा’मध्ये झाली एन्ट्री!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘धडक’ या चित्रपटानंतर जान्हवी सध्या दोन चित्रपटांत बिझी आहे. एक म्हणजे, गुंजन सक्सेनाचे बायोपिक आणि दुसरा म्हणजे, ‘तख्त’.

श्रीदेवी-बोनी कपूरची लाडकी लेक आणि ‘धडक’ स्टार जान्हवी कपूरने तिच्या करिअरचा चौथा सिनेमा साईन केलाय. होय, या चौथ्या चित्रपटात जान्हवी राजकुमार राव आणि वरूण शर्मासोबत धम्माल करताना दिसणार आहे. चित्रपटाचे नाव आहे, ‘रूहअफ्जा’. या चित्रपटाची घोषणा आधीच झाली होती. केवळ चित्रपटातील लीड हिरोईनच्या नावाची घोषणा  होणे तेवढे बाकी होते. आता या अभिनेत्रीच्या नावाची घोषणाही झालीय. दिशेन विजान निर्मित या हॉरर-कॉमेडी चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे.




गतवर्षी आलेल्या ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने अनपेक्षितपणे यश मिळवले होते. सगळे अंदाज खोटे ठरवत,या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री मिळवली होती. ‘स्त्री’च्या या अनपेक्षित यशानंतर निर्माता दिनेश विजन व अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा ‘रूहअफ्जा’ हा नवा कोरा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येणार आहेत.  या चित्रपटात जान्हवी डबल रोलमध्ये दिसणार आहे. रूही आणि अफ्जा असे दोन रोल ती साकारताना दिसेल.




‘धडक’ या चित्रपटानंतर जान्हवी सध्या दोन चित्रपटांत बिझी आहे. एक म्हणजे, गुंजन सक्सेनाचे बायोपिक आणि दुसरा म्हणजे, ‘तख्त’. गुंजन सक्सेनाच्या बायोपिकचे शूटींग सुरु आहे. तर ‘तख्त’ अद्यापही प्री-प्रॉडक्शन टप्प्यात आहे. ‘तख्त’ हा चित्रपट पुढील वर्षांत फ्लोरवर येईल, असे मानले जात आहे. त्यापूर्वी जान्हवी ‘रूहअफ्जा’ पूर्ण करणार आहे. याचवर्षी जूनमध्ये ‘रूहअफ्जा’चे शूटींग सुरु होत आहे. २० मार्च २०२० रोजी हा चित्रपट रिलीज होईल.
राजकुमारसोबत जान्हवीचा हा पहिला चित्रपट असेल. साहजिकच या नव्या-कोºया जोडीच्या ‘रूहअफ्जा’चा स्वाद चाखण्यास प्रेक्षक उत्सूक असतील.

Web Title: janhvi kapoor joins rajkummar rao varun sharma in roohafza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.