Hotness: ‘बिग बॉस11’च्या सहा-आठ महिन्यांत पुरती बदलली सपना चौधरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 10:55 AM2018-07-01T10:55:42+5:302018-07-01T10:58:30+5:30

‘बिग बॉस11’च्या सहा आठ महिन्यानंतर सपना पुरती बदलली आहे. ती कमालीची ग्लॅमरस दिसू लागली आहे.

Hotness: sapna chaudhary epic transformation from the bigg boss house | Hotness: ‘बिग बॉस11’च्या सहा-आठ महिन्यांत पुरती बदलली सपना चौधरी!

Hotness: ‘बिग बॉस11’च्या सहा-आठ महिन्यांत पुरती बदलली सपना चौधरी!

googlenewsNext

हरियाणाची सेन्सेशनल सिंगर व डान्सर सपना चौधरी हिच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. सलमान खानच्या ‘बिग बॉस11’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर तर सपनाचे फॅन फॉलोर्इंग आणखीच वाढले. केवळ इतकेच नाही तर तिच्यासाठी बॉलिवूडची कवाडेही उघडी झालीत. तूर्तास सपना चर्चेत आहे, ती तिच्या मेकओव्हरमुळे. होय, कायम सलवार-कुर्त्यात दिसणाऱ्या सपनाला सध्या तुम्ही बघाल तर, बघतचं राहाल़. अनेक जण तर तिला ओळखणारही नाहीत. ‘बिग बॉस11’च्या सहा आठ महिन्यानंतर सपना पुरती बदलली आहे. ती कमालीची ग्लॅमरस दिसू लागली आहे.

 सपनाने स्वत: तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पहिल्या फोटोत ती काळ्या रंगाच्या जंपसूटमध्ये आहे. या ड्रेससोबत काळ्या रंगाची हाय हिल्स आणि मोकळे केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

‘बिग बॉस11’मध्ये असताना सलमानने अनेकदा सपनाला तिच्या वाढलेल्या वजनावरून हसत हसत टोमणे मारले होते. कदाचित सलमानच्या या टोमण्यांचा सकारात्मक फायदा झालायं.

सपनाचा बदललेला अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड भावलाय. तुम्हाला सपनाचा हा नवा लूक कसा वाटला, ते आम्हाला जरूर कळवा.

खूप लहान वयात सपनाने स्टेजला आपलेसे केले. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रीय आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते.  सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कायम पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते. 

Web Title: Hotness: sapna chaudhary epic transformation from the bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.