गुरमित चौधरीकडे आहे सगळ्यात महागडी बाइक,किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 10:53 AM2018-08-06T10:53:26+5:302018-08-06T10:55:57+5:30

नुकताच मुंबईच्या रस्त्यावर आपल्या खास अंदाजात बाईकवरुन मस्त फेरफटका मारत  तो बाइक चालवताना दिसला.

Gurmati Chowdhury has the most expensive bike | गुरमित चौधरीकडे आहे सगळ्यात महागडी बाइक,किंमत वाचून व्हाल थक्क

गुरमित चौधरीकडे आहे सगळ्यात महागडी बाइक,किंमत वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

सेलिब्रिटींचे बाइक प्रेम जग जाहीर आहे आता या यादीत आणखीन एक नाव सामिल झाले आहे. तो म्हणजे छोट्या पडद्यावर भगवान रामच्या भूमिकेत झळकलेला गुरमित चौधरीही बाइक वेडा आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे  होंडा गोल्ड विंग बाइक आहे. नुकताच मुंबईच्या रस्त्यावर आपल्या खास अंदाजात बाईकवरुन मस्त फेरफटका मारत  तो बाइक चालवताना दिसला. त्यावेळी सा-यांच्याच नजरा त्याच्या या बाइकवर खिळल्या होत्या.गुरमीतच्या या लग्झरिअस बाइकची किंमत 30 लाखांहून अधिक आहे.विशेष म्हणजे भारतात ही बाइक फक्त दोनच शहरात मिळते. दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्येच ही बाइक विक्रीसाठी उपलब्ध आहे. गुरमितची पिळदार बॉडी ,त्याचा हटके लुक मुलींना  आजही वेड  लावतो  ज्या  गुरमितला पाहताच मुली घायाळ होतात तो मात्र बाईकचा दिवाना असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे ...गुरमितला त्याच्या फ्री टाईममध्ये बाईकवर फुल ऑन फिरायला आवडतं. 

लवकरच गुरमित 'पलटन' सिनेमात झळकणार आहे.जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन' सिनेमात तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात त्याने एका आर्मी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने त्याचे वडील मेजर सिताराम चौधरी यांच्याकडून धडे घेतले आहेत.सध्या सोशल मीडियावर त्याचा बाइकचा फोटो खूप व्हायरल होत असून बाइकवर चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याचा आगामी सिनेमा आणि त्याची बाइक या दोन कारणांमुळे गुरमित चर्चेत आहे.

रामायण पौराणिक मालिकेत राम सीताच्या भूमिकेत हे झळकलेले गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे कपल झळकले होते.गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी ही छोट्या पडद्यावरची एक रसिकांची फेव्हरेट जोडी मानली जाते.या दोघांनी रामायण या मालिकेत पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. आता हे दोघे आई-वडील बनले आहेत. या दोघांनी दोन लहान मुलींना दत्तक घेतले आहे.पूजा आणि लता अशी त्या दोघींची नावे आहेत.

Web Title: Gurmati Chowdhury has the most expensive bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.