निराश करणारी बातमी! राजकुमार रावचा ‘न्यूटन’ आॅस्कर शर्यतीतून बाहेर ! !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:59 AM2017-12-15T05:59:12+5:302017-12-15T11:37:30+5:30

बॉलिवूडसह तमात भारतीयांची निराशा करणारी बातमी आहे. होय, समिक्षकांकडून प्रचंड दाद मिळवणारा ‘न्यूटन’ हा चित्रपट आॅस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला ...

Frustrating news! Rajkumar Rao's 'Newton' out of Oscar race! ! | निराश करणारी बातमी! राजकुमार रावचा ‘न्यूटन’ आॅस्कर शर्यतीतून बाहेर ! !

निराश करणारी बातमी! राजकुमार रावचा ‘न्यूटन’ आॅस्कर शर्यतीतून बाहेर ! !

googlenewsNext
लिवूडसह तमात भारतीयांची निराशा करणारी बातमी आहे. होय, समिक्षकांकडून प्रचंड दाद मिळवणारा ‘न्यूटन’ हा चित्रपट आॅस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. होय,   सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागातून हा चित्रपट आॅस्करच्या शर्यतीत उतरला होता. पण आता हा चित्रपट शर्यतीतून बाद झाला आहे.
 









आॅस्कर Twitter हँडलवर अ‍ॅकेडमी अवार्डच्या ‘फॉरेन लँग्वेज फिल्म अवार्ड’ विभागात जागा मिळवणा-या नऊ चित्रपटांची यादी जाहिर करण्यात आली आहे. ‘#Oscars90 news:’ फॉरेन लँग्वेज फिल्म अवार्ड लिस्टमध्ये या ९ चित्रपटांची नावे आहेत. यापैकी आपण किती पाहिलीतं? असे या tweetमध्ये लिहिले आहे. या यादीत अ फनटॅस्टिक वूमन, इन द फेड, आॅन बॉडी अ‍ॅण्ड सोल, फॉक्सट्राट, द इनसल्ट, लव्हलेस, फेलिसीट, द स्क्वायर, द वूंड या चित्रपटांचा समावेश आहे.
मराठमोळा प्रयोगशील दिग्दर्शक अमित मसूरकर याचा ‘न्यूटन’ भारताकडून आॅस्करसाठी पाठवण्यात आला होता. अभिनेता राजकुमार राव याने  या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात देशातील राजकारणावर उपरोधिक भाष्य करण्यात आलेय. नूतन कुमार (राजकुमार राव) हा दहावी बोर्डाच्या परीक्षेवेळी आपले नाव न्यूटन असे लिहितो आणि पुढे त्याच नावाने ओळखला जातो.   त्यानंतर, त्याला नक्षलग्रस्त भागात निवडणूक अधिकारी म्हणून जावे लागते. लोकनाथ (रघुवीर यादव), मालको (अंजली पाटील), पोलीस अधिकारी आत्मा सिंह (पंकज त्रिपाठी) ही टीम घेऊन तो जंगलात जातो. तिथे गेल्यावर  गावात फक्त ७५ मतदार असल्याचे त्याला कळते. पण मतदानाच्या दिवशी कुणीच येत नाही. पण नंतर सगळे चित्रचं पालटते आणि वेगळाच निकाल समोर येतो, असे या चित्रपटाचे कथानक होते. या चित्रपटातील राजकुमारच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.

ALSO READ : ‘या’ इराणी चित्रपटाचा कॉपी आहे राजकुमार रावचा ‘न्यूटन’, सांगा कसा मिळेल आॅस्कर?

वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील २६ चित्रपटांमधून ‘न्यूटन’ला आॅस्करच्या शर्यतीत पाठवण्याचा निर्णय १४ सदस्यीय निवड समितीने घेतला  होता.

 

Web Title: Frustrating news! Rajkumar Rao's 'Newton' out of Oscar race! !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.