आमिर खानच्या चित्रपटांची ‘अधुरी कहानी’! चाहत्यांनाही बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 02:37 PM2019-01-25T14:37:31+5:302019-01-25T14:42:07+5:30

आज आम्ही आमिरच्या हिट, फ्लॉप चित्रपटांबद्दल नाही तर त्याच्या कधीही प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

Films Of Bollywood's Perfectionist Aamir Khan That Got Shelved | आमिर खानच्या चित्रपटांची ‘अधुरी कहानी’! चाहत्यांनाही बसेल धक्का!!

आमिर खानच्या चित्रपटांची ‘अधुरी कहानी’! चाहत्यांनाही बसेल धक्का!!

googlenewsNext
ठळक मुद्देआमिरचे हे चित्रपट वेगवेगळ्या कारणाने थंडबस्त्यात गेले.

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचे चित्रपट येतात आणि इतिहास रचतात. अर्थात त्याच्या गतवर्षी रिलीज झालेल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ने प्रेक्षकांची निराशा केली. आमिरचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. आज आम्ही आमिरच्या हिट, फ्लॉप चित्रपटांबद्दल नाही तर त्याच्या कधीही प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. आमिरचे हे चित्रपट वेगवेगळ्या कारणाने थंडबस्त्यात गेले.

लज्जो
आमिर खानच्या या चित्रपटात करिना कपूर झळकणार होती. या चित्रपटाची कथा ऊर्दू लेखिका इश्मत चुगतई यांच्या आयुष्यावर बेतलेली होती. निर्माता बॉबी बेदीने या चित्रपटाची घोषणा केली होती. स्टारकास्टचीही घोषणा झाली होती. पण चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या हक्कावरून हा चित्रपट वादात सापडला आणि पुढे बंद पडला.

रिश्ता
आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात आमिर व अमिताभ यांची जोडी प्रथमच एकत्र दिसली. पण खरे तर या जोडीला एकत्र पाहण्याची संधी फार वर्षांपूर्वीच प्रेक्षकांना मिळणार होती. ‘रिश्ता’ या चित्रपटासाठी ही जोडी फायनल झाली होती. पण कुठल्याशा कारणाने हा चित्रपट रखडला आणि ही जोडी बनता बनता राहिली.

  नानावटी प्रकरणावर आधारित चित्रपट
मीडियाचे मानाल तर आमिर खान एकेकाळी प्रचंड गाजलेल्या नानावटी प्रकरणावर चित्रपट बनवू इच्छित होता. पण त्याआधीच अक्षयने बाजी मारली. अक्षय कुमारचा ‘रूस्तम’ हा चित्रपट याच हत्याकांडावर आधारित होता. त्यामुळे आमिरने आपला प्रोजेक्ट बंद केला.

महाभारत
आमिर खान दीर्घकाळापासून ‘महाभारत’ या महाकाव्यावर चित्रपट बनवण्याच्या विचारात आहे. या चित्रपटाचा बजेट १००० कोटीच्या घरात होता. काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट येणार, असे मानले गेले होते. पण नंतर हा चित्रपट बंद झाल्याचेही वृत्त आले.

टाईम मशीन
आमिरचा मध्येच बंद पडलेला आणखी एक चित्रपट म्हणजे, टाईम मशीन. शेखर कपूर दिग्दर्शित या चित्रपटाच्या अनेक भागांचे शूटींगही झाले होते. १९९२ मध्ये तो रिलीज होणार होता. पण अचानक हा चित्रपटही थंडबस्त्यात गेला.

Web Title: Films Of Bollywood's Perfectionist Aamir Khan That Got Shelved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.