डिंपल कपाडियाची तीन वर्षांनंतर होणार वापसी! आलिया-रणबीरच्या चित्रपटात लागली वर्णी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:15 PM2018-07-17T13:15:48+5:302018-07-17T13:16:16+5:30

 डिंपल तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर वापसी करतेय. यापूर्वी २०१५ मध्ये ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात ती दिसली होती.

 Dimple Kapadia to return after three years! to feature in ranbir alia brahmastra | डिंपल कपाडियाची तीन वर्षांनंतर होणार वापसी! आलिया-रणबीरच्या चित्रपटात लागली वर्णी!!

डिंपल कपाडियाची तीन वर्षांनंतर होणार वापसी! आलिया-रणबीरच्या चित्रपटात लागली वर्णी!!

googlenewsNext

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ सध्या चर्चेत आहे. रणबीर व आलिया ही जोडी प्रथमचं या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. या जोडीसोबतच सुपरस्टार नागार्जुनच्या या चित्रपटातील एंट्रीने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक ताजी खबर आहे. होय, सुप्रसिद्ध अभिनेत्री डिम्पल कपाडिया ही सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. डिंपल तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर वापसी करतेय. यापूर्वी २०१५ मध्ये ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात ती दिसली होती. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये डिंपल कुठली भूमिका साकारणार, याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. नागार्जुन व ती एकत्र सीन्स देणार का, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. पण ही जोडी एकत्र आलीच तर नागार्जुन व डिंपल यांचा एकत्र केलेला हा पहिला सिनेमा असेल.
१९९० मध्ये राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून नागार्जुनने बॉलिवूड डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी आलेल्या ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता.
‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतोय. हा चित्रपट तीन भागांत रिलीज केला जाणार आहे. यात रणबीर प्रथमच सुपरहिरो अवतारात दिसेल. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या हा सिनेमा पुढील वर्षी १५ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title:  Dimple Kapadia to return after three years! to feature in ranbir alia brahmastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.