​८१ व्या वर्षी धर्मेन्द्र यांची ट्विटरवर ग्रॅण्ड एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 09:06 AM2017-08-18T09:06:15+5:302017-08-18T14:37:11+5:30

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेन्द्र यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ८१ वर्षांचे धर्मेन्द्र म्हणजेच धरमपाजी हेही आता सोशल ...

Dharmendra's grand entry on Twitter at 81 yrs !! | ​८१ व्या वर्षी धर्मेन्द्र यांची ट्विटरवर ग्रॅण्ड एन्ट्री!!

​८१ व्या वर्षी धर्मेन्द्र यांची ट्विटरवर ग्रॅण्ड एन्ट्री!!

googlenewsNext
लिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेन्द्र यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ८१ वर्षांचे धर्मेन्द्र म्हणजेच धरमपाजी हेही आता सोशल मीडियावर दिसणार आहेत. होय, गुरुवारी धर्मेन्द्र यांनी ट्विटरवर जोरदार एन्ट्री घेतली. केवळ इतकेच नाही तर ‘यमला पगला दिवाना फिर से’ या  आगामी चित्रपटाच्या सेटवरील दोन फोटो त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केलेत. ‘यमला पगला दिवाना फिर से .. नवीन सुरुवात, शूट मोड, हैद्राबाद,’असे त्यांनी हे फोटो शेअर करताना लिहिले आहे. ‘यमला पगला दिवाना; या चित्रपटाच्या तिसºया सिक्वलचे सध्या हैद्राबाद येथे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटातून सनी आणि बॉबी ही भावांची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
 





धरमपाजी ट्विटरवर आलेले पाहून त्यांचे मुलगे सनी आणि बॉबी देओल या दोघांनी त्यांचे स्वागत केले. मी व बॉबीने अखेर पापाला ट्विटरवर येण्यास राजी केलेच, असे सनीने लिहिले आहे. तर ‘माय हिरो इज फायनली हिअर,’असे बॉबीने त्यांना वेलकम करताना लिहिलेय. अभिषेक बच्चन, रितेश देशमुख अशा अनेकांनी त्यांना वेलकम केले आहे.  धर्मेंद्र यांना आतापर्यंत तीन हजारांवर लोकांनी फॉलो केले असून यात सनी, बॉबी आणि नातू करण देओल यांचाही समावेश आहे. ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाने करण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ALSO READ : ​धर्मेन्द्र-सनी-बॉबी देओल परतणार! ‘यमला पगला दिवाना3’ येणार!!

 बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आज सोशल मीडियावर सक्रिय आहे. किंबहुना सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात राहणे, ही बॉलिवूड सेलिब्रिटींची गरज झाली आहे. आपल्या चाहत्यांना सणांच्या शुभेच्छा देण्यापासून ते चित्रपटांची प्रसिद्धी करण्यापर्यंत सेलिब्रिटी ट्विटर, फेसबुक या सोशल साईटचा वापर करताना दिसत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये शहेनशहा अमिताभ बच्चन, बादशहा शाहरुख खान  सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय आहेत.  

Web Title: Dharmendra's grand entry on Twitter at 81 yrs !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.