दीपिका आधीच नववधूप्रमाणे समोर आली करिश्मा कपूर, पाहा तिचे मोहून टाकणारे सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 03:40 PM2018-10-31T15:40:09+5:302018-10-31T15:42:53+5:30

सोशल मीडियावरील करिश्माचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबू सुरु झाली आहे. या फोटोंमध्ये तिचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

Before Deepika Padukon karisma kapoor Bide black Orange bridal look Gone Viral | दीपिका आधीच नववधूप्रमाणे समोर आली करिश्मा कपूर, पाहा तिचे मोहून टाकणारे सौंदर्य

दीपिका आधीच नववधूप्रमाणे समोर आली करिश्मा कपूर, पाहा तिचे मोहून टाकणारे सौंदर्य

googlenewsNext

सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. गेल्या काही महिन्यात दिपिका आणि रणवीर सिंह आणि प्रियंका आणि निक जोनास यांचे लग्न ठरल्यानंतर आता आणखीन कोण कोण लग्न करणार आहे. याविषयीही चर्चांना उधाण आले आहेत.या सा-यांमध्ये लोलो करिश्मा कपूर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. याला कारण म्हणजे करिश्माचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो. त्यामुळे सोशल मीडियावरील करिश्माचे नववधू रुपातील फोटो पाहून तिच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या आहेत. 

सध्या करिश्माच्या सिनेमाची चर्चा नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांशी संवाद साधत असते. यानिमित्ताने आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते. मात्र सोशल मीडियावरील करिश्माचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबू सुरु झाली आहे. या फोटोंमध्ये तिचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या करिश्माचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. ब्लॅक आणि ऑरेंज कलर कांबीनेशन   लेंहग्यामध्ये करिश्माचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. तिचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून रसिकांध्ये तिच्या लग्नाची कुजबूज सुरु झाली. करिश्माचा लूक तर भारी मात्र ती लग्न करणार की काय अशा शक्यतेने रसिकांचा विशेषतः चर्चांना उधाण आले  आहे. मात्र या फोटोमागचे रहस्य म्हणजे तिने नुकतेच एक ब्रायडल फॅशन शोमध्ये या अंदाजात रॅम्प वॉक केले. मोठ्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच करिश्मा वेगळ्या आणि हटके अंदाजात रसिकांच्या समोर आली होती.


अभिषेकच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी ही करिश्मा कपूर होती. करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. परंतु प्रेमाची सुरुवात अभिषेकची बहीण श्वेताच्या लग्नानंतर झाली. त्याचकाळात अभिषेकला 'रेफ्यूजी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमात त्याच्या अपोझिट करिश्माची धाकटी बहीण करीना कपूर होती. करीना सेटवर अभिषेकला भावोजी अशी हाक मारायची असं बोललं जातं. करिश्मा नेहमी अभिषेकला भेटायला सेटवर यायची. अभिषेकचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला, मात्र दोघांचे प्रेम फुलतच गेले.

बिग बी अमिताभ यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना अभिषेक-करिश्माच्या प्रेमाविषयी समजले.दोघांचा साखरपुडाही झाला मात्र या नात्याला कुणाची तरी नजर लागली. हे ठरलेले लग्नही मोडले आणि त्यानंतर करिश्मा उद्योगपती संजय कपूरसह लग्नाची बेडीत अडकली. काही वर्ष संसार केल्यानंतप संजय कपूरशी घटस्फोट घेतला आणि बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत दिसायची. यावर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र करिश्माचे वडील रणधीर कपूरने यांनी या गोष्टी नाकारल्या.  आता संजय आणि करिश्माचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार करिश्माला दुसरं लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. तिला आपल्या मुलांना वेळ द्यायचा आहे.  
 

Web Title: Before Deepika Padukon karisma kapoor Bide black Orange bridal look Gone Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.