Pulwama Attack : कॉमेडीयन मल्लिका दुवा केले वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावरुन व्हिडीओ गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:53 AM2019-02-19T10:53:05+5:302019-02-19T12:17:15+5:30

काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते

Comedian mallika dua gave controversial statement on pulwama terror attack | Pulwama Attack : कॉमेडीयन मल्लिका दुवा केले वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावरुन व्हिडीओ गायब

Pulwama Attack : कॉमेडीयन मल्लिका दुवा केले वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावरुन व्हिडीओ गायब

googlenewsNext
ठळक मुद्दे कॉमेडीयन मल्लिका दुवा हिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहेमल्लिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय

काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानविरोधात जनक्षोभ उसळलेला असताना कॉमेडीयन मल्लिका दुवा हिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मल्लिकाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मल्लिकाने म्हणतेय, संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे रॅली काढल्या जातात या सगळ्याचा काय उपयोग होणार आहे. देशात रोज लोक अन्न न मिळाल्यामुळे, आजारामुळे दगावतात मात्र तरीही देश सुरु आहेना. राजकारणी आपलं आयुष्य सामान्यपण जगातायेत त्यांच्या आयुष्यात काही फारसा बदल झालेला नाही. मग आपण हे दु:ख कोणासाठी करतोय? मल्लिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सोशल मीडियावर मल्लिका चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. त्यानंतर मल्लिकाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वरुन काढून टाकण्यात आला आहे.


बॉलिवूडच्या अनेकांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आता यापुढे जात, इंडस्ट्रीने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी लादली आहे. फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईजने पाकी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजनेही पाकिस्तानी गायकांनी गायलेली गाणी हटवली आहेत. यात पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान अशा पाकी गायकांचा समावेश आहे. सलमान खान यानेही पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आतिफ असलमने गायलेले एक गाणे आपल्या चित्रपटातून काढून टाकले आहे. सलमान खान निर्मित ‘नोटबुक’मध्ये आतिफ असलमने गायलेले एक गाणे होते. हे गाणे गाळण्याचा आदेश सलमानने दिला आहे.

Web Title: Comedian mallika dua gave controversial statement on pulwama terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.