सेलिना जेटलीची सात वर्षांनंतर होणार ‘वापसी’; या चित्रपटात साकारणार मुलीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 02:29 PM2018-10-25T14:29:20+5:302018-10-25T14:30:34+5:30

एलजीबीटी कार्यकर्ता आणि अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. होय, ‘अ ट्रिब्युट टू रितुपर्णो घोष- सीजन्स ग्रीटिंग्स’ या चित्रपटातून सेलिनाची मोठ्या पडद्यावर वापसी करणार आहे. 

Celina Jaitley to star in Ram Kamal Mukherjee's A Tribute to Rituparno Ghosh: Season's Greetings | सेलिना जेटलीची सात वर्षांनंतर होणार ‘वापसी’; या चित्रपटात साकारणार मुलीची भूमिका

सेलिना जेटलीची सात वर्षांनंतर होणार ‘वापसी’; या चित्रपटात साकारणार मुलीची भूमिका

googlenewsNext

एलजीबीटी कार्यकर्ता आणि अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. होय, ‘अ ट्रिब्युट टू रितुपर्णो घोष- सीजन्स ग्रीटिंग्स’ या चित्रपटातून सेलिनाची मोठ्या पडद्यावर वापसी करणार आहे. या चित्रपटाची कथा आई आणि लेकीच्या कथेवर आधारित आहे. यात सेलिना मुलीची भूमिका साकारणार आहे तर लिलेट दुबे तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
सेलिना गत ७ वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होती. पीटर हागसोबत लग्न केल्यानंतर ती संसारात रमली होती. आपल्या तीन मुलांच्या संगोपनात बिझी होती. पण आता सेलिना पुन्हा अभिनयाकडे वळली आहे. खुद्द सेलिनानेच ही माहिती दिली. राम कमल मुखर्जी यांचा प्रोजेक्ट साईन करून मी आनंदी आहे. इतकी वर्षे मी अशाच क्रिएटीव्ह प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत होते. रामने मला दुबईत या चित्रपटाची कथा ऐकवली आणि ती मला प्रचंड आवडली, असे तिने सांगितले.
सेलिना जेटलीने २००१ मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता आणि २००१ मध्ये झालेल्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत चौथ्या स्थानावर होती. सेलिनाने २००३ मध्ये ‘जानशीन’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती.  नो एंट्री, गोलमाल', टॉम डिक एंड हैरी या चित्रपटातही दिसली आहे. तिने २०११ मध्ये बिजनेसमॅन पीटर हागशी लग्न केले आणि मार्च २०१२ मध्ये विराज आणि विंस्टन या जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यानंतर गतवर्षी सेलिनाने आणखी जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र त्यापैकी एक मुलगा जास्त दिवस जिवंत राहू शकला नाही.

Web Title: Celina Jaitley to star in Ram Kamal Mukherjee's A Tribute to Rituparno Ghosh: Season's Greetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.