बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर का आली बुरखा घालून फिरण्याची वेळ?, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 01:20 PM2019-01-30T13:20:18+5:302019-01-30T13:26:15+5:30

चित्रपटात श्रद्धा आणि वरूणमध्ये कोणताही रोमँटिक अँगल दाखवणार नसून चित्रपट केवळ डान्सवर आधारित असणार असल्याचे रेमोने म्हटले होते.

Burkha clad shraddha kapoor visits hospital meet fan | बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर का आली बुरखा घालून फिरण्याची वेळ?, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल कौतुक

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर का आली बुरखा घालून फिरण्याची वेळ?, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल कौतुक

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून श्रद्धाने आपल्या 13 वर्षीय फॅनची भेट घेतली

 श्रद्धा कपूर 'एबीसीडी ३'मध्ये दिसणार आहे. 'एबीसीडी ३' या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहेत. चित्रपटात श्रद्धा आणि वरूणमध्ये कोणताही रोमँटिक अँगल दाखवणार नसून चित्रपट केवळ डान्सवर आधारित असणार असल्याचे रेमोने म्हटले होते. अशात चित्रपटात श्रद्धाची भूमिका काय असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात श्रद्धा कपूर एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी ती सध्या डान्सचे धडेदेखील घेत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सध्या अमृतसरमध्ये सुरूवात झाली असल्याचे म्हटले जात आहे. 

आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून श्रद्धाने आपल्या 13 वर्षीय फॅन सौम्याची भेट घेतली आहे. श्रद्धाची ही फॅन एका आजाराने ग्रस्त आहे तिच्यावर मुंबईतल्या एक सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सौम्याला भेटायला जाण्यासाठी श्रद्धाने चक्क बुरखा घातला जेणेकरुन तिला कुणी ओळखू नये. श्रद्धाने या फॅनसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याला श्रद्धाने एक कॅप्शन देखील दिले आहे.


सध्या श्रद्धा साहोच्या शूटिंगसाठी हैदराबाद-मुंबई असा प्रवास करतेय. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू करतेय.सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

Web Title: Burkha clad shraddha kapoor visits hospital meet fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.