पहिल्यांदाच मुलगा धरमसोबत बघावयास मिळाला बॉबी देओल, व्हिडीओ होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 12:34 PM2018-06-15T12:34:00+5:302018-06-15T18:04:09+5:30

बॉबी देओल ‘रेस-३’मध्ये डॅशिंग अंदाजात बघावयास मिळत असून, त्यानिमित्त तो पहिल्यांदाच आपल्या परिवारासोबत दिसून आला. याबाबतचा त्याचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

Bobby Deol got the first time to see his son Dharam, the video is viral! | पहिल्यांदाच मुलगा धरमसोबत बघावयास मिळाला बॉबी देओल, व्हिडीओ होतोय व्हायरल!

पहिल्यांदाच मुलगा धरमसोबत बघावयास मिळाला बॉबी देओल, व्हिडीओ होतोय व्हायरल!

googlenewsNext
ेस-३’ या चित्रपटातून बॉबी देओल आपले फिल्मी करिअर पटरीवर आणण्यासाठी धडपड करीत आहे. सलमान खानसोबत तो ‘रेस-३’मध्ये बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आता बॉबी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. कारण ‘रेस-३’नंतर ‘हाउसफुल-४’मध्येही त्याला कास्ट करण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त फॅमिलीची हिट सीरीज ‘यमला पगला दीवाना फिर से’ या प्रोजेक्टवरही सध्या तो काम करीत आहे. ‘रेस-३’मध्ये तर तो चक्क शर्टलेस अंदाजात बघावयास मिळाला आहे. असो आज आम्ही बॉबीच्या परिवाराविषयी सांगणार आहोत. खरं म्हणजे बºयाच काळानंतर चित्रपटाच्या अनुषंगाने तो आपल्या परिवारासोबत बघावयास मिळाला आहे. 

बॉबीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, त्यामध्ये तो पत्नी आणि मुलासोबत बघावयास मिळत आहे. बॉबी देओलचा मुलगा धरम देओल आणि पत्नी तान्या देओल त्याच्यासोबत खूपच आनंदी दिसत आहेत. खरं तर असे बºयाच कमी वेळा बघावयास मिळते की, देओल परिवारातील सदस्यांच्या पत्नी आणि मुले त्यांच्यासोबत दिसतात. त्यामुळे बॉबीचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. बॉबी पत्नी आणि मुलासोबत खूपच आनंदी दिसत आहे. खरं तर त्याच्या आनंदाला तसे कारणही आहे. तो बºयाच काळानंतर स्क्रीनवर डॅशिंग अंदाजात झळकत आहे. 
 

बॉबीबद्दल आणखी एक चांगली बातमी समोर येत आहे. तो तब्बल सात वर्षांनंतर ‘आयफा २०१८’मध्ये परफॉर्म करणार आहे. बॉबीने ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाउल ठेवले होते. त्यानंतर ‘सोल्जर’ आणि ‘गुप्त’ या सुपरहिट चित्रपटामुळे तो इंडस्ट्रीत स्टार बनला. परंतु मधल्या काळात अचानकच तो इंडस्ट्रीमधून गायब झाला. आता पुन्हा एकदा त्याच्या करिअरला टर्न मिळाला असून, तो पहिल्यासारख्याच अंदाजात पडद्यावर काम करण्यास उत्सुुक आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतानाही दिसून येत आहे.

Web Title: Bobby Deol got the first time to see his son Dharam, the video is viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.