Birthday Special: पाहा, ‘धडक’ गर्ल जान्हवी कपूरचे काही खास फोटो...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:14 PM2019-03-06T12:14:03+5:302019-03-06T12:16:02+5:30

‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मधून जान्हवीने डेब्युू केला. लवकरच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

Birthday Special: Look, some special photos of Janhavi Kapoor | Birthday Special: पाहा, ‘धडक’ गर्ल जान्हवी कपूरचे काही खास फोटो...!

Birthday Special: पाहा, ‘धडक’ गर्ल जान्हवी कपूरचे काही खास फोटो...!

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीदेवींनी केवळ जान्हवीला तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी तयार केले नाही तर तिच्या डेब्यू सिनेमाची निवडही श्रीदेवींची होती.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर हिचा आज (६ मार्च) वाढदिवस. वयाची २२ वर्षे पूर्ण करणारी जान्हवी आजही आईच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेली नाही. गतवर्षी जान्हवीच्या वाढदिवसाच्या दहा दिवसांपूर्वी श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला. जान्हवीसाठी हा मोठा धक्का होता. आज श्रीदेवी आपल्यात नाहीत. पण जान्हवीत श्रीदेवी झलक कायम दिसत राहिल. गतवर्षी जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मधून जान्हवीने डेब्युू केला. लवकरच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. आज वाढदिवसानिमित्त जान्हवीचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...

जान्हवीला लहानपणापासूनचं मॉडेलिंगची आवड होती. तिची ही आवड दाखवणारा हा बालपणीचा फोटोही असाच..

जान्हवीने धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर २०१५ मध्ये ती कॅलिफोर्नियाला गेली. येथे तिने स्टारबर्ग थिएटर अ‍ॅण्ड फिल्म इंन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवलेत.

 ‘धडक’ आधी जान्हवीला एक साऊथचा चित्रपट आॅफर झाला होता. या चित्रपटात अभिनेता महेश बाबू मुख्य भूमिकेत होता. पण जान्हवीने या चित्रपटाला नकार दिला.

अभिनेत्री व्हायचे, हे जान्हवीने कधीच ठरवून टाकले होते. पण जान्हवीने चित्रपटात यावे, अशी श्रीदेवींची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना जान्हवीला डॉक्टर बनलेले बघायचे होते. पण जान्हवीच्या इच्छेचा आदर करत, अखेर श्रीदेवींनी तिच्या निर्णयाला पाठींबा दिला.

श्रीदेवींनी केवळ जान्हवीला तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी तयार केले नाही तर तिच्या डेब्यू सिनेमाची निवडही श्रीदेवींची होती. ‘धडक’ची स्क्रिप्ट स्वत: श्रीदेवींनी निवडली होती. आपल्या मुलीचा पहिला चित्रपट सुपरहिट व्हावा, तिचा ग्रॅण्ड डेब्यू व्हावा, अशी श्रीदेवींची इच्छा होती.

राजकुमार राव हा जान्हवीचा आवडता अभिनेता आहे. एका मुलाखतीत खुद्द जान्हवीने हे सांगितले होते. मी अनेकदा राजकुमारचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी त्याच्या फोटोवर कमेंट करायचे, असे तिने सांगितले होते. आता याच राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करण्याची तयारी जान्हवीने चालवली आहे.
 

Web Title: Birthday Special: Look, some special photos of Janhavi Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.