इमरान-अवंतिकाच्या घटस्फोटावर अवंतिकाच्या आईने सोडले मौन, केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 10:56 AM2019-06-11T10:56:50+5:302019-06-11T11:04:35+5:30

बॉलिवूड अभिनेता इमरान खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.

Avantika mom spoke about imran-avantika divorce | इमरान-अवंतिकाच्या घटस्फोटावर अवंतिकाच्या आईने सोडले मौन, केला मोठा खुलासा

इमरान-अवंतिकाच्या घटस्फोटावर अवंतिकाच्या आईने सोडले मौन, केला मोठा खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देअवंतिका इमरानचे घर सोडून आपल्या आई-वडिलांसोबत राहत असल्याची चर्चा आहे''अवंतिका आणि इमरानमध्ये काही मतभेद आहेत''

बॉलिवूड अभिनेता इमरान खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपासून इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून अवंतिका इमरानचे घर सोडून आपल्या आई-वडिलांसोबत राहत असल्याची चर्चा आहे. 


बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार अवंतिकाची आई वंदना मलिक यांनी यासर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.त्या म्हणाल्या अवंतिका आणि इमरानमध्ये काही मतभेद आहेत. मात्र ते कोणते हे अद्याप कळलेले नाहीय. आपले पर्सनल प्रोब्लेम हे दोघे सोडवू शकतात की हे येणार काळाच सांगले. मात्र दोघांच्या घटस्फोटच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत.  इमरान आणि अवंतिकाचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार सध्या दोघांमधले भांडणं मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत.   


इमरानने २०११ साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे. २००८ मध्ये इमरानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट राहिला आणि इमरानचे करिअर मार्गी लागले.

पाठोपाठ अनेक चित्रपटांत तो दिसला. पण यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही. २०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. अलीकडे दिग्दर्शनातही हात आजमवण्याचे प्रयत्न इमरानने सुरु केले होते. 

Web Title: Avantika mom spoke about imran-avantika divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.