सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:50 PM2019-04-05T13:50:25+5:302019-04-05T13:51:30+5:30

पापा सुनील शेट्टीला लेकीच्या करिअरची चिंता सतावू लागली. कदाचित याच चिंतेपोटी सुनील शेट्टी अथियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ढवळाढवळ करू लागलाय. 

athiya shettys FILM motichoor chaknachoor is in trouble because of dad suniel shetty | सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!!

सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मोतीचूर चकनाचूर’  हा चित्रपट देब हसन दिग्दर्शित करत आहेत. तर राजेश् व किरण भाटिया या चित्रपटाचे निर्माते आहेत.

सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी हिने  ‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला आणि अथियाच्या करिअरची नौका डगमगू लागली. म्हणायला, अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. दुसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका आणखी खोलात बुडाली आणि पापा सुनील शेट्टीला लेकीच्या करिअरची चिंता सतावू लागली. कदाचित याच चिंतेपोटी सुनील शेट्टी अथियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ढवळाढवळ करू लागलाय. 


होय, लवकरच अथिया ‘मोतीचूर चकनाचूर’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. यात ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोझिट दिसणार आहे. पण सुनीलने लेकीच्या या चित्रपटात नको इतकी ढवळाढवळ चालवली आहे. सुनीलच्या या वागण्याने चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक सगळे इतके वैतागले की, अखेर त्यांनी सुनीलला पब्लिक नोटीस जारी केले.


मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील शेट्टीला या प्रोजेक्टमध्ये ढवळाढवळ करण्याचा कुठलाही अधिकार नाही. चित्रपट पूर्ण होत नाही, तोपर्यंत सुनील यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही. या नोटीसनंतरही सुनीलचा चित्रपटातील हस्तक्षेप थांबला नाहीच तर त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.  अद्याप सुनील वा अथिया कुणीही या नोटीसवर स्पष्टीकरण दिलेले नाही. बाप म्हणून सुनील शेट्टीची चिंता कुणीही समजू शकेल. पण या चिंतेपोटी लेकीच्या व्यावसायिक आयुष्यात ढवळाढवळ मात्र कुणीही सहन करू शकत नाही. सुनील आणि अथिया हे जितक्या लवकर समजतील, तितके चांगले. होय ना?
‘मोतीचूर चकनाचूर’  हा चित्रपट देब हसन दिग्दर्शित करत आहेत. तर राजेश् व किरण भाटिया या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Web Title: athiya shettys FILM motichoor chaknachoor is in trouble because of dad suniel shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.