होणाऱ्या वहिनीचा बोल्ड लूक पाहून अर्पिता खानने केले असे काही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 02:44 PM2019-06-04T14:44:04+5:302019-06-04T14:44:41+5:30

सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि अरबाज खानची गर्लफ्रेन्ड जॉर्जिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा

arpita khan asked to arbaaz khan girlfriend pull down your dupatta at baba siddique iftar party | होणाऱ्या वहिनीचा बोल्ड लूक पाहून अर्पिता खानने केले असे काही!

होणाऱ्या वहिनीचा बोल्ड लूक पाहून अर्पिता खानने केले असे काही!

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षी अरबाजने आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला होत्या. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत अरबाजने जॉर्जियासोबतचे नाते जगजाहिर केले होते.

सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि अरबाज खानची गर्लफ्रेन्ड जॉर्जिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा. बाबा सिद्दीकीच्या या इफ्तार पार्टीत सलमान खान, सलीम खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा असे सगळेच पोहोचले. सलमान कतरीना कैफसोबत आला आणि अरबाज त्याची गर्लफ्रेन्ड जॉर्जियासोबत. पण जॉर्जियाने एन्ट्री घेतली आणि अर्पिताचा चेहरा खरकन् उतरला.
आपल्या होणाºया वहिणीचा बोल्ड लूक पाहून ती अवाक् झाली. मग काय, अर्पिताने स्वत:च जॉर्जियाला तिची ओढणी ठीक करायला सांगितले. होय, स्पॉटबॉयने आपल्या आॅफिशिअल टिष्ट्वटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.



(साभार)

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, अर्पिता जॉर्जियाच्या कानात काहीतरी कुजबुजली. ती काय कुजबुजली, हे तर माहित नाही. पण यानंतर लगेच जॉर्जिया तिची ओढणी सावरताना दिसते. यानंतर लगेच ती मागे वळते आणि अरबाज तिला कव्हर करतो. काही वेळानंतर जॉर्जियाची ओढणी पिनने टक केलेली दिसते.

जॉर्जियाने या पार्टीत क्रिम कलरचा लहंगा घातला होता आणि त्याच्या टॉपमध्ये डीप नेक लाईन होती. पार्टीच्या हिशेबाने तिचा हा लूक बोल्ड होता. अर्पिताने हे हेरले आणि वेळकाळ व प्रसंग पाहून आपल्या होणाºया वहिणीला वेळीच सावध केले.
गतवर्षी अरबाजने आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला होत्या. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत अरबाजने जॉर्जियासोबतचे नाते जगजाहिर केले होते. या पार्टीत अरबाजची एक्स-वाईफ मलायकाही सामील झाली होती. आताश: खान कुटुंबाने अरबाज व जॉर्जियाचे नाते मान्य केले आहे.

Web Title: arpita khan asked to arbaaz khan girlfriend pull down your dupatta at baba siddique iftar party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.