मलायका अरोरा नाही; ‘ही’ आहे अर्जुन कपूरची ‘लेडी ऑफ लाईफ’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 01:11 PM2019-01-07T13:11:20+5:302019-01-07T13:12:56+5:30

अर्जुन कपूर सध्या  ‘रील लाईफ’पेक्षा त्याच्या ‘रिअल लाईफ’मुळे चर्चेत आहे. बॉलिवूडची हॉट दीवा मलायका अरोरासोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा सध्या प्रचंड चवीने चघळल्या जात आहे. पण अर्जुनच्या आयुष्यात एक अशीही महिला आहे, जी अर्जुनसाठी मलायकापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे.

arjun kapoor reveles anshula kapoor is his life not malaika arora | मलायका अरोरा नाही; ‘ही’ आहे अर्जुन कपूरची ‘लेडी ऑफ लाईफ’!!

मलायका अरोरा नाही; ‘ही’ आहे अर्जुन कपूरची ‘लेडी ऑफ लाईफ’!!

googlenewsNext

अर्जुन कपूर सध्या  ‘रील लाईफ’पेक्षा त्याच्या ‘रिअल लाईफ’मुळे चर्चेत आहे. बॉलिवूडची हॉट दीवा मलायका अरोरासोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा सध्या प्रचंड चवीने चघळल्या जात आहे. पण अर्जुनच्या आयुष्यात एक अशीही महिला आहे, जी अर्जुनसाठी मलायकापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. होय, हे आम्ही नाही तर खुद्द अर्जुनने कबुल केले आहे. अर्जुनच्या आयुष्यात ती ‘लेडी ऑफ लाईफ’ दुसरीकुणी नसून त्याची लहान बहीण अंशुला कपूर आहे. इन्स्टा अकाऊंटवर खुद्द अर्जुनने याची कबुली दिली.


अलीकडे अर्जुन मुंबईच्या ट्रॅफिक जाममध्ये फसला होता. अशात अर्जुनने इन्स्टा अकाऊंटवर आपल्या चाहत्यांसाठी एक इंटरॅक्शन सेशन करण्याचे ठरवले. यादरम्यान त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिलीत. एका चाहत्याने अर्जुनला त्याच्या आणि अंशुलाच्या नात्याबद्दल विचारले आणि अर्जुनने ती माझी ‘लेडी ऑफ लाईफ’ असल्याचे सांगितले.


मी माझ्या बहिणीच्या सगळ्यांत जवळ आहे. ती माझी ‘लेडी ऑफ लाईफ’ आहे,असे अर्जुन म्हणाला.अर्जुन अंशुलाप्रति कमालीचा प्रोटेक्टिव्ह आहे. अनेकप्रसंगी त्याने हे दाखवून दिले आहे. आईच्या मृत्यूनंतर अर्जुन व अंशुला या दोघांनी एकमेकांना सांभाळले. याचकाळात अंशुला अर्जुनची जणू आई बनली.


अर्जुनच्या लव्हलाईफबद्दल सांगायचे तर तूर्तास तो व मलायका बिनधास्त फिरताना दिसताहेत. अर्जुनच्या कुटुंबाने हे रिलेशनशिप मान्य केले आहे.  अलीकडे हे कपल हातात हात घालून दिसले होते. निमित्त होते संजय कपूर यांनी दिलेल्या न्यू ईअर पार्टीचे. या पार्टीत मलायका व अर्जुन दोघांनीही हातात हात घालून एन्ट्री घेतली. केवळ इतकेच नाही तर एका फ्रेममध्ये अर्जुन मलायकाच्या खांद्यावर हात टाकून उभा असलेलाही दिसला.

यापूर्वी अर्जुन व मलायका एका प्री-ख्रिसमस पार्टीत दिसले होते. या पार्टीतही अर्जुन व मलायका दोघेही एकाच गाडीतून पोहोचले होती. या गाडीत मलायका अर्जुनच्या मागच्या सीटवर होती तर अर्जुन कपूर ड्राईव्ह करताना दिसला होता. अर्जुनच्या बाजूच्या सीटवर त्याचे काका संजय कपूर होते.

Web Title: arjun kapoor reveles anshula kapoor is his life not malaika arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.