​अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चे पहिले गाणे ‘दम दम’ रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 11:02 AM2017-02-16T11:02:23+5:302017-02-16T16:32:23+5:30

या गाण्यामधून अनुष्का व दलजितमधील फुलत जाणारे प्रेम दाखविण्यात आले आहे.

Anushka Sharma's Fillori debut 'Dum Dum' release | ​अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चे पहिले गाणे ‘दम दम’ रिलीज

​अनुष्का शर्माच्या ‘फिलौरी’चे पहिले गाणे ‘दम दम’ रिलीज

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता दिलजित दोसांज यांच्या मुख्य भूमिका असणाºया ‘फिलौरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यामधून अनुष्का व दलजितमधील फुलत जाणारे प्रेम दाखविण्यात आले आहे. आगळे वेगळे कथानक असलेला फिलौरी हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. 



अनुष्का शर्मा व दलजित दोसांझ यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले ‘दम दम उठती है दुआ सौ पंख लगा तेरे नाम के’ असे बोल असणारे हे गाण्याला विवेक हरिहरन व रोमी यांनी सुफी अंदाजात गायले आहे. अन्विता दत्तने हे सुरेख गाणे लिहिले असून शाश्वत दत्त यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. सुरेल असलेले हे गाणे चाहत्यांच्या मनात घर करू शकते असेही सांगण्यात येते. अनुष्का शर्माच्या गतकाळ या गाण्यातून दाखविण्यात आला आहे.  अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तयार होणाºया ‘फिलौरी’ या चित्रपटाला चाहत्यांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. अनुष्का आणि दिलजितच्या लूकपासून ते अगदी या चित्रपटाच्या वेगळ्या कथानकाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.  अशातच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले असून यातून फिलौरीचे कथानक उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा दिलजित दोसांज आता चांगलाच स्थिरावला आहे. ‘फिलौरी’ या चित्रपटातून अनुष्का शर्मा आणि दिलजित दोसांज ही एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २४ मार्चला अनुष्का आणि दिलजितचा हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होत असतानाच अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहलीची जोडी देखील सध्या चर्चेत आहे. 

Web Title: Anushka Sharma's Fillori debut 'Dum Dum' release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.