​अनुराग कश्यप करणार रोमाँटिक चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 09:45 PM2016-10-28T21:45:26+5:302016-10-28T21:45:26+5:30

डार्क, गुढ चित्रपट निर्मितीत हातखंडा असलेले दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या चौकटीतून बाहेर पडू पाहतोय. विशेष म्हणजे त्यांना रोमाँटिक ड्रामा ...

Anurag Kashyap will make a romantic movie | ​अनुराग कश्यप करणार रोमाँटिक चित्रपट

​अनुराग कश्यप करणार रोमाँटिक चित्रपट

googlenewsNext
ong>डार्क, गुढ चित्रपट निर्मितीत हातखंडा असलेले दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या चौकटीतून बाहेर पडू पाहतोय. विशेष म्हणजे त्यांना रोमाँटिक ड्रामा दिग्दर्शित करायचा आहे. त्यांच्या आगामी चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिका करणार असल्याचे समजते. 

मागील काही चित्रपटांमध्ये अनुराग अपयशी ठरला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘बाँबे वेलवेट’ व ‘रामन राघव 2.0’ हे सपेशल अपयशी ठरले. ‘उडता पंजाब’ला देखील अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. यामुळे त्याने आपला जोनर बदलविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटात रोमाँटिक चित्रपटांचा चेहरा ठरू पाहत असलेला रणवीर सिंग याची प्रमुख भूमिका असेल. हा चित्रपट रणवीरने साईन केला असल्याचे समजते. विशेष म्हणजे या चित्रपटाला ए.आर. रहेमान संगीत देणार आहे. 

अनुराग मागील चित्रपटांच्या अपयशामुळे थोडा निराश झाला असून त्याला आता एका हिट चित्रपटाची गरज आहे. यामुळेच त्याने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. देव डी, गुलाल, गँग आॅफ वासेपूर या चित्रपटांना समीक्षकांसोबतच प्रेक्षकांची पसंती लाभली होती. बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांत त्याचा समावेश झाला होता. ऐवढेच नव्हे तर दिग्दर्शक करण जोहरने देखील त्याच्या ‘बाँबे वेलवेट’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. मात्र बाँबे वेलवेट अनुराग व करण या दोघांसाठी ‘घाट्याचा सौदा’ ठरला होता. 

सध्या बॉलिवूडमध्ये रणवीर सिंगची चलती असल्याने आपला चित्रपट रणवीर तारू शकेल असे अनुरागला वाटू लागले आहे. मागील काही वर्षांत रणवीरचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत. रणवीर लवकरच आदित्य चोपडाच्या ‘बेफ्रिके’ या चित्रपटात दिसणार आहे. 

Web Title: Anurag Kashyap will make a romantic movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.