अनन्या पांडे रूपेरी पडद्यावर झळकण्या आधीच ठरते लोकप्रिय, पाहा तिचे ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 09:55 AM2019-04-12T09:55:33+5:302019-04-12T10:01:40+5:30

जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांच्या पेक्षाही जास्त पसंती अनन्याला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Ananya Panday's latest photo shoot pics will make you restless for the release of Student Of The Year 2 | अनन्या पांडे रूपेरी पडद्यावर झळकण्या आधीच ठरते लोकप्रिय, पाहा तिचे ग्लॅमरस फोटोशूट

अनन्या पांडे रूपेरी पडद्यावर झळकण्या आधीच ठरते लोकप्रिय, पाहा तिचे ग्लॅमरस फोटोशूट

googlenewsNext

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिला खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. अनन्या सोशल मीडियावर तर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या एका फोटोशूटने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. रूपेरी पडद्यावर झळकण्याआधी अनन्या पांडेने सा-यांची मनं जिंकण्यास सुरूवात केली आहे. 

अनन्याने एली मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. तसेच  रूपेरी पडद्यावर झळकण्याआधीच  अनन्याला अनेक ब्रँडच्या जाहीरातीसाठीही ऑफर्स येऊ लागल्या आहेत.  विशेष म्हणजे एली मॅगझिनसाठी केलेले अनन्याचे हे पहिले फोटोशूट आहे.  या फोटोशूटसाठी तिने टॉमी एक्स ज़ेंडाया ब्रांडचा ड्रेस परिधान केला आहे.

अनन्या फक्त 19 वर्षांची आहे. परंतु फॅशन आणि स्टाइलबाबत असलेली तिची चॉइस अत्यंत क्लासी आहे. सेक्सी आउटफिट्ससोबतच ट्रेडिशनल आउटफिट्स ती एकदम हटके स्टाइलमध्ये कॅरी करते. तिच्या याच अदांवर तरूणांसोबतच तरूणीही फिदा आहेत.

अनन्या आपली स्टाइल आणि फॅशन स्टेटमेंटमार्फत बॉलिवूडमध्ये आधीपासूनच आपली वेगळी जागा तयार करणाऱ्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांना टक्कर देत आहे. जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांच्या पेक्षाही जास्त पसंती अनन्याला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच कार्तिक आर्यन सोबत 'पति पत्नी और वो' हा सिनेमादेखील तिने साईन केला आहे. तुर्तास अनन्याच्या फोटोशूटने सा-यांच्या नजरा आकर्षित केल्यामुळे सोशल मीडियावर तिचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळतंय.   

Web Title: Ananya Panday's latest photo shoot pics will make you restless for the release of Student Of The Year 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.