‘झुंड’च्या शूटींगसाठी अमिताभ बच्चन नागपुरात! चाहते झालेत क्रेझी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 01:28 PM2018-12-03T13:28:43+5:302018-12-03T13:32:48+5:30

‘झुंड’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सोमवारी नागपुरात दाखल झालेत. चार्टर्ड प्लेनने अमिताभ नागपूर विमानतळावर दाखल झालेत आणि यानंतर थेट हॉटेलकडे रवाना झालेत.

amitabh bachchan reaches nagpur shooting for zund | ‘झुंड’च्या शूटींगसाठी अमिताभ बच्चन नागपुरात! चाहते झालेत क्रेझी!!

‘झुंड’च्या शूटींगसाठी अमिताभ बच्चन नागपुरात! चाहते झालेत क्रेझी!!

googlenewsNext

‘झुंड’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सोमवारी नागपुरात दाखल झालेत. चार्टर्ड प्लेनने अमिताभ नागपूर विमानतळावर दाखल झालेत आणि यानंतर थेट हॉटेलकडे रवाना झालेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटासाठी शहरातील मोहननगर स्थित सेंट जॉन स्कूलमध्ये सेट लावण्यात आला आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी अमिताभ बच्चन काही दिवस नागपुरात राहणार, असे प्रारंभी सांगण्यात आले होते. पण ताज्या माहितीनुसार, अमिताभ त्यांच्या शेड्यूलच्या दिवशी विशेष विमानाने नागपुरात येतील आणि काम संपवून त्याचदिवशी मुंबईला परततील, असे कळतेय. अर्थात अद्याप अधिकृत माहिती प्राप्त होऊ श्कली नाही. अमिताभ नागपुरात पहिल्यांदा शूटींग करणार आहेत. सोमवारी सकाळी ते अतिशय गुपचूपपणे नागपुरात पोहोचले. पण तरिही चाहत्यांना ते नागपुरात आल्याचा सुगावा लागला. यानंतर क्रेझी चाहत्यांनी एकच गर्दी केली.


काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी  नागराज यांच्या या चित्रपटातून माघार घेतल्याची खबर आली होती. प्रारंभी या चित्रपटासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला होता. यामुळे चित्रपटाचे अख्खे वेळापत्रक विस्कटले होते आणि याचा परिणाम म्हणजे, अमिताभ बच्चन यांचे वेळापत्रकही वेळापत्रक बिघडले होते.  यामुळे वैतागून अमिताभ यांनी या चित्रपटातून माघार घेतल्याचे म्हटले गेले होते.
 अमिताभ यांचा हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.‘झुंड’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. साहजिकचं त्यांच्यासाठीचं नव्हे तर तमाम मराठीजनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

  
 

Web Title: amitabh bachchan reaches nagpur shooting for zund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.