आलिया भटच्या आईने भावी जावई रणबीर कपूरबाबत केले 'हे' वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 10:32 AM2019-03-28T10:32:52+5:302019-03-28T10:42:21+5:30

आलिया भटची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीकडे सध्या ती आनंदी आहे. बॅक टू बॅक सध्या आलियाने हिट सिनेमा दिले आहेत.

Alia bhatt mother soni razdan speaks about ranbir kapoor | आलिया भटच्या आईने भावी जावई रणबीर कपूरबाबत केले 'हे' वक्तव्य

आलिया भटच्या आईने भावी जावई रणबीर कपूरबाबत केले 'हे' वक्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्दे'राजी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्काराने सान्मानित करण्यात आले.एक आई म्हणून त्या आलियाला नेहमीच सपॉर्ट करणार

आलिया भटची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीकडे सध्या ती आनंदी आहे. बॅक टू बॅक सध्या आलियाने हिट सिनेमा दिले आहेत. रणबीर कपूरसोबत तिचे रिलेशनशीपची गाडी रुळावर आहे. यंदाच्या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डमध्ये तिला 'राजी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्काराने सान्मानित करण्यात आले.

आलियाच्या यशाबाबत बोलताना आई सोनी राजदान म्हणाल्या, मला माझ्या मुलीवर गर्व आहे. ज्यावेळी त्यांना रणबीरबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्या म्हणाल्या, रणबीर चांगला मुलगा आहे मात्र मला आलियाच्या पर्सनल लाईफ बाबत काही बोलायचे नाही. पुढे त्या हेही म्हणाल्या, कुणाला डेट करायचे हा आलियाची चॉईस आहे. एक आई म्हणून त्या आलियाला नेहमीच सपॉर्ट करणार. 

आलिया आणि रणबीरच्या जोडीला कपूर आणि भट दोन्ही कुटुंबियांकडून होकार आहे. अनेक वेळा आलिया रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत पार्टी करताना दिसते. रिपोर्टनुसार दोघे याचवर्षी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरची आई नीतू कपूर दोघांसाठी सध्या घर शोधते आहे. हे घर मुंबईत नाही तर न्यूयॉर्कमध्ये असणार आहे आणि नीतू कपूर त्यासाठी मेहनत करते. म्हणजे तिचा मुलगा व सून अमेरिकेला गेल्यानंतर तिथे राहू शकतील. याचा अर्थ हा नाही की लग्नानंतर ते दोघे तिथे राहणार.

 वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर आलिया लवकरच सलमान खानसोबत 'इंशाअल्लाह'मध्ये दिसणार आहे. इंशाअल्लाह’ हा चित्रपट एक लव्ह ड्रामा असल्याचे कळतेय. संजय लीला भन्साळी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांदाच सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

Web Title: Alia bhatt mother soni razdan speaks about ranbir kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.