या दिग्दर्शकामुळे झाले आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचे पॅचअप ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 09:13 AM2017-11-03T09:13:06+5:302017-11-03T14:43:06+5:30

शाहरुख खानच्या बर्थ डे पार्टी पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रा आणि अलिया भट्ट एकत्र दिसले आणि चर्चा सुरु झाल्या. ऐवढेच ...

Alia Bhatt and Siddharth Malhotra's patches happened due to this director? | या दिग्दर्शकामुळे झाले आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचे पॅचअप ?

या दिग्दर्शकामुळे झाले आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचे पॅचअप ?

googlenewsNext
हरुख खानच्या बर्थ डे पार्टी पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रा आणि अलिया भट्ट एकत्र दिसले आणि चर्चा सुरु झाल्या. ऐवढेच नाही तर शाहरुखच्या बर्थ डे पार्टीनंतर आलिया जेव्हा मीडियासमोर आली तेव्हा तिने सिद्धार्थने आदल्या दिवशी घातलेल्या टी-शर्टमध्ये दिसली. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चाने जोर धरला आहे.
काही दिवसांपूर्वी आलिया आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. दोघांचे रस्ते वेगळे झाले इथे पर्यंतच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. ए जेंटलमॅनच्या शूटिंग दरम्यान सिद्धार्थ आणि जॅकलिन फर्नांडिसच्या वाढत्या जवळकिमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असे म्हणायचे तर कधी आलियाचा एक्स बॉयफ्रेंड तिच्या आयुष्यात परतल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर अनेक पार्ट्ंयामध्ये दोघे एकमेकांना इग्नोर करताना दिसले. मात्र दिवाळीच्या पार्टीत आणि त्यानंतर शाहरुखच्या बर्थडे पार्टीत दोघे एकत्र दिसले.    

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार निर्माता करण जोहरने या दोघांमध्ये पुन्हा एकदा पॅच-अप करुन द्यायचे काम करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण जोहरने दोघांना एकत्र बसून समजवले की तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनले आहात. करणने आलिया आणि सिद्धार्थला सांगितले कि तुम्ही दोघांनी आपल्या नात्याला आणखीन एक चान्स द्यायला हवा. ज्यानंतर आलिया आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा एकत्र आले. 

ALSO READ :  ​हे फोटो पाहिल्यानंतर आलिया भट्ट अन् सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपची बातमी तुम्हालाही वाटेल खोटी!!

आजच सिद्धार्थ मल्होत्राचा ‘इत्तेफाक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून अक्षय खन्नाने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे. ‘इत्तेफाक’ हा यश चोप्रा यांच्या ७० च्या दशकात आलेल्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा आॅफिशिअल रिमेक आहे. रिमेकमध्ये मात्र ही जागा सिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिन्हा या दोघांनी घेतलीय. तर आलिया लवकरच आयन मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र चित्रपटा झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करतो आहे. यात पहिल्यांदाच आलियासोबत रणबीर कपूर दिसणार आहे. तसेच यात बिग बी अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने मेघना गुलजारच्या राजी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.  

Web Title: Alia Bhatt and Siddharth Malhotra's patches happened due to this director?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.