आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' रिलीज आधीच बनवला 'हा' रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 10:34 AM2018-09-29T10:34:38+5:302018-09-29T10:37:35+5:30

बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. ट्रेलर सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे

Aamir khans thugs of hindostan before release made record | आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' रिलीज आधीच बनवला 'हा' रेकॉर्ड

आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' रिलीज आधीच बनवला 'हा' रेकॉर्ड

ठळक मुद्देया सिनेमाचे बजेट 210 कोटी असल्याचे समजतेय. चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे

बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. ट्रेलर सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या ट्रेलरने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.  या ट्रेलरला आता पर्यंत 27 मिलियन लोकांनी बघितले आहे. जो स्वत:मध्ये एक मोठा रेकॉर्ड आहे.   
ठग्सच्या ट्रेलर यूट्यूबवर सुद्धा प्रेक्षकांच्या चांगली पसंती मिळतेय. 2.7 कोटी लोकांनी ट्रेलर बघितला आहे. याआधी दोन आठवड्यापूर्वी आलेल्या अक्षयकुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0'च्या ट्रेलर 35 मिलियन लोकांनी बघितला होता. याच्या तुलनेत ठग्सच्या ट्रेलरला एकदिवसात 27 मिलियन लोकांनी बघणे यावरुन प्रेक्षकांमध्ये यासिनेमाबाबत असलेला उत्साह कळतोय. 

 या सिनेमाचे बजेट 210 कोटी असल्याचे समजतेय. आहे. ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे.  या सिनेमाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. येत्या 9 नोव्हेंबरला या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Aamir khans thugs of hindostan before release made record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.