शेजाऱ्यांचीही उत्कंठा शिगेला ! खास आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ पाहण्यासाठी येणार भारतात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 10:44 AM2018-10-25T10:44:48+5:302018-10-25T10:45:49+5:30

 लवकरच आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट रिलीज होतोय.  भारतातचं नाही तर अगदी शेजारी देशातील चाहत्यांनाही आमिरच्या चित्रपटांनी वेड लावले आहे.

aamir khans china fans are planning to come india to see thugs of hindostan | शेजाऱ्यांचीही उत्कंठा शिगेला ! खास आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ पाहण्यासाठी येणार भारतात!!

शेजाऱ्यांचीही उत्कंठा शिगेला ! खास आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ पाहण्यासाठी येणार भारतात!!

googlenewsNext

आमिर खानला असेच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जात नाही, कुठलेही काम तो अगदी जीव ओतून करतो. आमिर वर्षातून एकच चित्रपट करतो. पण त्याचा हा एकच चित्रपट बॉक्सआॅफिसवर कोट्यवधीचा बिझनेस करतो. आमिरची हीच अदा, त्याचा हाच अंदाज त्याच्या चाहत्यांना भावतो. त्यामुळेच चाहते वर्षभर त्याच्या चित्रपटाची प्रतीक्षा करतात. भारतातचं नाही तर अगदी शेजारी देशातील चाहत्यांनाही आमिरच्या चित्रपटांनी वेड लावले आहे, यामागे हेच कारण आहे. लवकरच आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाकडेही प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. साहजिकच आपला हाही चित्रपट सुपरडुपर ब्लॉकबस्टर व्हावा, अशी आमिरची इच्छा आहे आणि त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी काही विदेशी चाहते भारतात येत आहे. होय, चीनचे काही चाहते खास आमिरचा हा चित्रपट पाहण्यासाठी भारतात येणार आहे.
चीनमध्ये ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ रिलीज व्हायला बराच वेळ लागणार आहे. इतकी कळ सोसण्याची चीनी चाहत्यांची मुळीच इच्छा नाही. त्यामुळेच भारतात येऊन हा चित्रपट पाहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
आमिर खान विदेशांमध्ये प्रचंड लोकप्रीय आहे़ विशेषत: चीनमध्ये तर त्याचे असंख्य चाहते आहेत. आमिरच्या अनेक चित्रपटांनी चीनमध्ये बक्कळ कमाई केली आहे. त्याचा पीके, दंगल, सीक्रेट सुपरस्टार हे चित्रपट जगात सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. दंगल या चित्रपटाने चीनमध्ये १९०८ कोटींचा बिझनेस केला होता. सीक्रेट सुपरस्टारने ८७४ कोटी कमावले होते. चीनी चाहत्यांची उत्सुकता बघता आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा आगामी चित्रपटही चीनमध्ये सुपरडुपर हिट होईल, असेच चित्र आहे.

Web Title: aamir khans china fans are planning to come india to see thugs of hindostan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.