आमिर खानला राजकारणाची वाटते भीती! म्हणे, मी अभिनेताचं बरा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:23 PM2018-09-17T15:23:54+5:302018-09-17T15:24:50+5:30

बॉलिवूडचा हा सुपरस्टार सामाजिक मुद्यांवर हिरहिरीने बोलणारा असला तरी राजकारणात मात्र त्याला जराही रस नाही. आम्ही बोलतोय ते बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल. 

aamir khan said he do not want politics he is scared about this | आमिर खानला राजकारणाची वाटते भीती! म्हणे, मी अभिनेताचं बरा!!

आमिर खानला राजकारणाची वाटते भीती! म्हणे, मी अभिनेताचं बरा!!

googlenewsNext

बॉलिवूडचा हा सुपरस्टार सामाजिक मुद्यांवर हिरहिरीने बोलणारा असला तरी राजकारणात मात्र त्याला जराही रस नाही. आम्ही बोलतोय ते बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल. होय, आमिरला राजकारणाची अक्षरश: भीती वाटते. अलीकडे एका मुलाखतीत आमिर यावर बोलला.
राजकारणात येण्याचा तुझा काही इरादा आहे का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर माझा असला कुठलाही इरादा नसल्याचे आमिरने स्पष्ट केले. मला राजकारणी बनण्यात काहीही रस नाही. मी अभिनेता बनूनचं समाजासाठी खूप काही करू शकतो, अशी माझी धारणा आहे. मला राजकारणाची खरे तर भीती वाटते. त्यामुळे मी यापासून चार हात लांब राहणेच पसंत करतो. मी एक कलाकार आहे, रचनात्मक व्यक्ति आहे. राजकीय नेत्यासारखी माझी विचारधारा नाही. मला लोकांचे मनोरंजन करण्याची इच्छा आहे. हेच काम मी अधिक चांगल्याप्रकारे करू शकतो, असे मला वाटते, असे आमिर यावेळी म्हणाला.
आमिर खान सध्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहे. आजचं या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले. या चित्रपटात आमिरसोबतचं कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख आणि अमिताभ बच्चन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या दिवाळीत आमिरचा हा चित्रपट रिलीज होत आहे.

हा चित्रपट १९३९ साली आलेल्या ‘कन्फेशन्स आॅफ ए ठग’ या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. आमिर खान यात मुख्य भूमिकेत आहे. संबंधित कादंबरीत आमिर अली नावाचा एक ठग असतो आणि तो इंग्रजांच्या नाकीनऊ आणतो. तो एक पठाण आहे. इस्माईल नावाचा एक मोठा ठग त्याला जवळ करतो आणि मुलासारखे वाढवतो. आमिर अली त्याचे मित्र बद्रीनाथ आणि पीर खानसोबत ठगबाजी सुरू करतो. यात गणेशा आणि चीता त्याची मदत करतात. नंतर आमिर अली मोठा जमीनदार बनतो, असे याचे कथानक आहे. कादंबरीतील आमिर अलीचे हेच पात्र आमिर साकारतो आहे.

Web Title: aamir khan said he do not want politics he is scared about this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.