अमित्रियनच्या झोळीतही मोठे यश

By Admin | Published: October 21, 2015 03:42 AM2015-10-21T03:42:13+5:302015-10-21T03:42:13+5:30

त्याची मराठी इंडस्ट्रीमध्ये २०११ मध्येच एंट्री झाली. नुसती एंट्री नाही तर ‘मान्य’ आणि ‘वंडरबॉय’ या दोन मराठी चित्रपटांत मुख्य भूमिकाही साकारली. त्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर

Big success of Amritain | अमित्रियनच्या झोळीतही मोठे यश

अमित्रियनच्या झोळीतही मोठे यश

googlenewsNext

त्याची मराठी इंडस्ट्रीमध्ये २०११ मध्येच एंट्री झाली. नुसती एंट्री नाही तर ‘मान्य’ आणि ‘वंडरबॉय’ या दोन मराठी चित्रपटांत मुख्य भूमिकाही साकारली. त्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘सत्या २’ या चित्रपटातही तो लीड रोलमध्ये होता. मात्र, तरीही त्याच्या चित्रपटांना विशेष यश न मिळाल्याने हा हिरो मागेच पडला, पण आता मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपट ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’मध्ये विक्रमदादा ही भूमिका त्याने अतिशय सुंदर पेलली आणि प्रेक्षकांची... विशेष म्हणजे तरुणींची पसंती मिळवली.
आता लक्षात आलेच असेल की, हे सारे वर्णन आहे ते ‘अमित्रियन पाटील’ या हिरोचे. तीन विशेष यश न मिळालेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’मध्ये दाखवलेल्या बड्या फॅमिलीप्रमाणेच अमित्रियनच्या झोळीतही भलं मोठं यश पडलं आहे आणि त्यात दिग्दर्शकाने चित्रपटाच्या प्रोमोजमधून अमित्रियनचे दर्शनही होऊ न दिल्याने प्रेक्षकांसाठी एक आगळंवेगळं सरप्राइजच होतं, असं म्हणायला लागेल, पण त्यामुळेच ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’मुळे अमित्रियनला खरा ब्रेक मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

Web Title: Big success of Amritain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.