बेगम जानची लोकमत वुमेन समीटला उपस्थिती

By Admin | Published: March 25, 2017 01:02 AM2017-03-25T01:02:04+5:302017-03-25T01:02:04+5:30

‘बेगम जान’ या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असून, महेश भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. लोकमत वुमेन समीटमध्ये विद्या आणि महेश यांनी हजेरी लावली होती.

Begum Jan's Lokmat Woman Meet Meet | बेगम जानची लोकमत वुमेन समीटला उपस्थिती

बेगम जानची लोकमत वुमेन समीटला उपस्थिती

googlenewsNext

‘बेगम जान’ या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असून, महेश भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. लोकमत वुमेन समीटमध्ये विद्या आणि महेश यांनी हजेरी लावली होती. त्या वेळी ‘महिलांचे हक्क आणि कर्तव्य’ यांवर तिने भाष्य केले आणि त्याचसोबत त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले.
आवाज उठवणे महत्त्वाचे...
‘बेगम जान’ या चित्रपटात लढा देताना ती कोणत्याच गोष्टींना घाबरत नाही. कारण प्रतिष्ठा, मानसन्मान या कोणत्याच गोष्टींची तिला पर्वा नाही. पण, खऱ्या आयुष्यात महिला कुटुंब, कुटुंबाची इभ्रत, नातेसंबंध या गोष्टींमध्ये अडकलेली असते. त्यामुळे तिचा झालेला छळ, शोषण याबाबत लढा देणे तिच्यासाठी सोपे नसते. पुरुषप्रधान संस्कृतीने बांधून दिलेल्या मर्यादांमधून बाहेर पडणे तिच्यासाठी अशक्य असते. पण, बेगम जानसारख्या चित्रपटांमुळे या गोष्टींचा विचार तरी करायला मदत मिळते आणि काही काळाने तरी असे चित्रपट स्त्रियांना आपला आवाज उठवण्यासाठी प्रेरित करतील.
बेगमजानबद्दल...
सशक्त आणि बोल्ड भूमिका साकारण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. अशा प्रकारच्या भूमिका साकारताना तुम्हाला अभिनय करताना एक प्रकारचे स्वातंत्र्य मिळते. ‘बेगम जान’ या चित्रपटातील माझी भूमिकादेखील खूप बोल्ड आहे. ती मान-मर्यादा या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. मी माझ्या खऱ्या आयुष्यात कधीच शिव्या देत नाही. पण, या चित्रपटात मी शिव्या देताना देखील प्रेक्षकांना दिसणार आहे. माझा राग शिव्यांच्यामार्फत बाहेर काढण्याची मला या चित्रपटामुळे संधी मिळाली आहे.
सेलिब्रेटींच्या माध्यमातून समाजकार्य
समाजकार्य करणारे, स्वच्छतेसाठी झटणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत. ते खरे हिरो आहेत. पण, जर माझ्यासारख्या अभिनेत्रीने एखादा संदेश दिल्याने समाजात काही बदल होणार असतील, लोकांच्या आयुष्यात काही परिवर्तन होणार असेल, तर या गोष्टी करायला मी नक्कीच पुढाकार घेते. लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते.

Web Title: Begum Jan's Lokmat Woman Meet Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.