"बाहुबली-2" च्या प्रमोशनपासून अनुष्का शेट्टी ठेवतेय स्वतःला दूर,कारण...

By Admin | Published: March 30, 2017 08:57 PM2017-03-30T20:57:08+5:302017-03-30T20:57:08+5:30

"बाहुबली-2 द कन्क्ल्यूजन"मध्ये मुख्य भूमिका साकारणा-यांपैकी एक अनुष्का शेट्टी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनपासून स्वतःला दूर ठेवत आहे

Anushka Shetty keeps herself away from the promotion of "Bahubali-2", because she ... | "बाहुबली-2" च्या प्रमोशनपासून अनुष्का शेट्टी ठेवतेय स्वतःला दूर,कारण...

"बाहुबली-2" च्या प्रमोशनपासून अनुष्का शेट्टी ठेवतेय स्वतःला दूर,कारण...

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 30 - "बाहुबली-2 द कन्क्ल्यूजन"मध्ये मुख्य भूमिका साकारणा-यांपैकी एक अनुष्का शेट्टी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनपासून स्वतःला दूर ठेवत असल्याचं वृत्त आहे. मुंबईत बाहुबली-2 चा ट्रेलर लॉन्च झाला त्यावेळीही अनुष्का गायब होती. पण कोणा कलाकारासोबत तिचे खटके उडालेले नाहीत तर तिचं वाढतं वजन याला कारणीभूत ठरत आहे.
 
अनुष्काच्या वाढत्या वजनामुळे फिल्म मेकर्सना तिच्या लूकवर बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. एडिटिंगचा वापर करून तिचं वाढतं वजन लपवण्याचा सिनेमा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. 
 
चित्रपट करण्याचा करार करण्यात आला त्यावेळी अनुष्काचं वजन इतकं नव्हतं पण चित्रीकरणाला सुरूवात झाली तेव्हापासून तिचं वजन वाढायला सुरूवात झाली. त्यामुळे तिचे सर्वच सीन निर्मात्यांना एडिट करावे लागणार आहेत. वाढत्या वजनामुळे अनुष्का चित्रपटाच्या सर्व प्रमोशनल इव्हेंटपासून स्वतःला दूर ठेवत आहे.   केवळ सिनेमाचं म्यूझिक लॉन्च झालं होतं त्यावेळी अनुष्का दिसली होती. 
 
एस. एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरला प्रेक्षकांनी अभूतपुर्व प्रतीसाद दिला आहे. प्रभाष, राणा डग्‍गुबती स्टारर "बाहुबली-2" बाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेला प्रश्न "कटप्‍पा ने बाहुबली को क्‍यों मारा?" याचं उत्तरही मिळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Anushka Shetty keeps herself away from the promotion of "Bahubali-2", because she ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.