अलीगढ चित्रपट समीक्षण - भटकलेला आणि पकड सुटलेला

By Admin | Published: February 26, 2016 07:31 PM2016-02-26T19:31:18+5:302016-02-26T19:31:18+5:30

समलैंगिकता आज आमच्या समाजात एक संवेदनशील मुद्दा मानला जातो. त्यावर चर्चाही चालते. हाच संवेदनशील मुद्दा हातात घेऊन दिग्दर्शक हंसल मेहता यांनी अलिगढ हा चित्रपट बनविला आहे.

Aligarh Film Review - Locked and Grip Escape | अलीगढ चित्रपट समीक्षण - भटकलेला आणि पकड सुटलेला

अलीगढ चित्रपट समीक्षण - भटकलेला आणि पकड सुटलेला

googlenewsNext

रेटिंग स्टार-२

समलैंगिकता आज आमच्या समाजात एक संवेदनशील मुद्दा मानला जातो. त्यावर चर्चाही चालते. हाच संवेदनशील मुद्दा हातात घेऊन दिग्दर्शक हंसल मेहता यांनी अलिगढ हा चित्रपट बनविला आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची कथा अलिगढ विद्यापीठात मराठी शिकविणाऱ्या सिराज या प्रोफेसरची आहे. समलैंगिक संबंध ठेवण्याच्या आरोपाखाली विद्यापीठ त्याला कामावरून कमी करते. दिल्लीतील एका वृत्तपत्राचा पत्रकार या प्रकरणाचे सत्य जाणून घेऊ इच्छितो. प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयापर्यंत पोहोचते. न्यायालय प्रोफेसरला पुन्हा कामावर घेण्याचा आदेश देते. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन होते काय? हा सवाल उपस्थित करून चित्रपट एका वळणावर येऊन थांबतो. चित्रपटातील उणिवा : चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे काय दाखवावे आणि काय नाही हा विचार करून हंसल मेहता फसले आहेत. त्यामुळे चित्रपट कमजोर पडतो. चित्रपटाची थीम काहीही असली तरीही प्रेक्षकांच्या संवेदना त्याच्याशी जोडल्या गेल्या पाहिजेत, ही आवश्यक बाब आहे; पण चित्रपटात हे होत नाही. संवेदनेच्या मुद्यावर चित्रपट बहुतेक वेळा पालथा पडतो. समलैंगिकतेचा गंभीर मुद्दा आणि प्रोफेसरसोबत घडलेल्या घटनाक्रमात हंसल मेहता संतुलन राखू शकले नाहीत. केव्हा ते प्रोफेसरच्या खासगी जीवनात हरवतात तर केव्हा समलैंगिकतेचा मुद्दा हाताळण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात ते आपला उद्देश विसरतात. चित्रपटाचा वेग फारच कमी आहे. निम्म्यापेक्षा जास्त घटना प्रोफेसरचे पात्र मजबूत करण्यात गेल्या आहेत. त्यांचे औचित्य समजत नाही. दिपू या पत्रकाराची भूमिकाही अर्धवट राहिली आहे. दिग्दर्शक म्हणून हंसल मेहता हा मुद्दा आणि प्रोफेसरची केस हाताळण्यात यशस्वी झाले नाहीत. चित्रपटाची वैशिष्ट्ये : मनोज वाजपेयी यांनी प्रोफेसरची भूमिका चांगली रंगवली आहे. या भूमिकेत ते अगदी चपखल बसले आहेत. त्यांनी स्वत:ची निवड सार्थ ठरविली आहे. राजकुमार रावचे कॅरेक्टर दुर्बल आहे, पण पडद्यावरील या पात्राची सहजता प्रभावित करते. मनोज वाजपेयी आणि राजकुमार राव यांच्या प्रभावी भूमिकेशिवाय चित्रपटात काहीही नाही. त्यांची भूमिका हेच चित्रपटाचे आकर्षण आहे. चित्रपट का पाहू नये? मनोज आणि राजकुमार राव यांच्या भूमिकेसाठी हा चित्रपट पाहिला तरीही तो एका विशिष्ट वर्गासाठी आहे. समलैंगिकतेचा मुद्दा आणि संवेदनशीलता जे समजतात त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे. कदाचित या वर्गालाही चित्रपट आवडणार नाही. एकूण हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करेल असे वाटत नाही. त्यामुळे तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरण्याची शक्यता कमीच आहे. -अनुज अलंकार

Web Title: Aligarh Film Review - Locked and Grip Escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.