सैराटच्या वादळानंतरही तीन दिवसांत 45 लाखांचा गल्ला

By Admin | Published: May 25, 2016 03:18 AM2016-05-25T03:18:26+5:302016-05-25T03:18:26+5:30

सैराटपाठोपाठ नुकताच रीलीज झालेला ‘पैसा पैसा’ हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळविण्यात यशस्वी झाला आहे. प्रसिद्धीवर अफाट पैसा न खर्च करता एका अनोख्या

After the storm of Sairat, in the three days, the gate of 45 lakhs | सैराटच्या वादळानंतरही तीन दिवसांत 45 लाखांचा गल्ला

सैराटच्या वादळानंतरही तीन दिवसांत 45 लाखांचा गल्ला

googlenewsNext

सैराटपाठोपाठ नुकताच रीलीज झालेला ‘पैसा पैसा’ हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळविण्यात यशस्वी झाला आहे. प्रसिद्धीवर अफाट पैसा न खर्च करता एका अनोख्या कल्पकतेने प्रमोशन केल्याने पुन्हा एकदा केवळ टाइमपास नव्हे, तर आशयघन चित्रपट पाहण्याला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अभिनेता सचित पाटील, स्पृहा जोशी आणि मिलिंद शिंदे यांचा दमदार अभिनय आणि कथेतील नावीन्य तसेच उत्तम सादरीकरण यामुळे ‘पैसा पैसा’ चांगलाच गाजतोय. तीन दिवसांत ‘पैसा पैसा’नेही ४५ लाखांचा गल्ला जमवला आहे. ‘सैराट’च्या वादळात थिएटर आणि योग्य शोज न मिळूनदेखील ‘पैसा पैसा’ चित्रपटाचे यश खरंच कौतुकास्पद आहे. उत्तम आशय, अभिनय आणि सादरीकरण असेल तर मराठी सिनेरसिक चित्रपटगृहात येतातच, याचे उत्तम उदाहरण ‘पैसा पैसा’ या चित्रपटाने घालून दिले आहे. मित्राला कुणीतरी फक्त १० हजार रुपयांसाठी किडनॅप केलंय आणि तेही परक्या शहरात... दोन तासांत १० हजार रुपये पोचले नाहीत तर मित्राचा जीव घेण्याची धमकी... आणि ते जमविण्यासाठी मित्राची होणारी तगमग.. मित्र, नातेवाईक म्हणवून घेणाऱ्यांचे टराटरा फाटणारे मुखवटे, पैसे मागितल्यावर फोन स्विच आॅफ करणारी गर्लफ्रेंड, त्याच वेळी गरीब दुकानदाराचा दिलदारपणा... अशा कितीतरी मनाला भिडणाऱ्या गोष्टी या सिनेमातून जगाचं आणि जगण्याचं खरं रूप दाखवतात.

Web Title: After the storm of Sairat, in the three days, the gate of 45 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.