विराट कोहली ठरला भारताच्या विजयाचा मंत्र

ज्याप्रकारे भारत श्रीलंकेविरुद्ध सहज वर्चस्व गाजवेल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते, त्याकडे पाहता भारताने मिळवलेला विजय नक्कीच लौकिकास साजेसा ठरला नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:29 AM2017-12-08T02:29:47+5:302017-12-08T11:06:17+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli becomes the mantra of India's victory | विराट कोहली ठरला भारताच्या विजयाचा मंत्र

विराट कोहली ठरला भारताच्या विजयाचा मंत्र

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार

ज्याप्रकारे भारत श्रीलंकेविरुद्ध सहज वर्चस्व गाजवेल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते, त्याकडे पाहता भारताने मिळवलेला विजय नक्कीच लौकिकास साजेसा ठरला नाही. पहिला आणि तिसरा सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीलंकेने थोडीफार प्रतिष्ठा जपण्यात यश मिळवले. पण असे असले, तरी कर्णधार विराट कोहली याने मात्र आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर संपूर्ण मालिका गाजवली. या मालिका विजयासह भारताने काही विक्रमही नोंदवले. आता कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. कसोटी मालिकेतील भारतीयांच्या कामगिरीचे विश्लेषण ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी ‘लोकमत’साठी केले...

विराट कोहली (9.5/10)
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराटने अप्रतिम प्रदर्शन केले. अखेरच्या ३ कसोटींमध्ये तब्बल ६१० धावांचा तडाखा देत त्याने दोन द्विशतके झळकावली. त्याचबरोबर कोहलीने आपल्या नेतृत्वामध्ये नवव्या मालिका विजयाचीही नोंद केली. एकूणच विराट भारताचा विजयी मंत्र ठरला आहे.

मुरली विजय (8/10)
तांत्रिकदृष्ट्या नेहमी संथ असलेल्या मुरलीने बचाव आणि आक्रमण यामध्ये चांगला ताळमेळ साधला. पुनरागमनाचा दबाव नक्कीच जाणवला, पण दोन शतके झळकावताना मुरलीने सलामीवीर म्हणून संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती मिळवली.

शिखर धवन (6.5)
शिखर मालिकेत फारसा आक्रमक जाणवला नाही, पण पुरेसे सातत्य राखत स्वत:चा चांगला फॉर्म टिकवण्यात यशस्वी ठरला. आगामी दक्षिण आफ्रिका दौºयात तो खूप महत्त्वाचा ठरेल. शिवाय विजय-धवन असे लेफ्ट-राइट संयोजनही संघाला मिळते.

चेतेश्वर पुजारा (7.5/10)
पुजारा नेहमीच भक्कम खेळ करण्यात योगदान देतो. त्याने अनेकदा आपल्या फलंदाजीने संघाला अवघड प्रसंगातून बाहेर काढले. खेळपट्टीवर नांगर टाकून सामन्याच्या प्रसंगानुसार खेळण्याची कला पुजाराशिवाय अजून कोणाकडे दिसत नाही.

रोहित शर्मा (8/10)
मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेल्या रोहितने दोन्ही हातांनी ही संधी साधत आपली छाप पाडली. त्याने तीन डावांत एक शतक व दोन अर्धशतके झळकावले. शिवाय, अनेक आकर्षक आणि क्रिकेटींग फटके खेळताना त्याने आगामी आफ्रिका दौºयासाठी अंतिम अकरामध्ये स्वत:चे स्थान निश्चित केले आहे.

अजिंक्य रहाणे ()1.5/10)
५ डावांमध्ये केवळ १७ धावा काढलेला रहाणे या मालिकेतील भारताचा एकमेव अपयशी खेळाडू ठरला. एकूणच त्याचे अपयश संघासाठी खूप चिंतेची बाब ठरत आहे. काही मोठ्या खेळी खेळून स्वत:वरील दडपण दूर करण्याची रहाणेला गरज आहे. हीच इच्छा संघ व्यवस्थापनाचीही आहे.

लोकेश राहुल (4.5)
गुणवान सलामीवीर म्हणून वर्षाची सांगता केली. त्याने मालिकेत एक अर्धशतक झळकावताना आपली उपयुक्ता सिद्ध केली. तसेच, धवन आणि विजय यांना पर्याय म्हणूनही आपली ओळख निर्माण केली.

रिद्धिमान साहा (7.5/10)
आघाडीची फळी सातत्याने चांगली कामगिरी करत असताना साहाला फलंदाजीत छाप पाडण्याची फारशी संधी मिळाली नाही. यष्ट्यांमागे त्याची कामगिरी जबरदस्त झाली. ९ झेल घेताना त्याने सुमारे ५०० षटकांमध्ये केवळ ९ धावा अवांतर दिल्या. मूर्ती लहान, पण कीर्ती महान असेच साहाच्या बाबतीत म्हणावे लागेल.

रविचंद्रन आश्विन(8/10)
फलंदाजीमध्ये आश्विनने नाराजी केली, पण गोलंदाजीत तो अप्रतिम ठरला. त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो भारताचा किंबहुना जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. त्याने चतुराईने आणि आक्रमकतेने मारा केला. सर्वांत कमी कसोटी सामन्यात ३०० बळींचा टप्पा पार केल्यानंतर आता त्याचे लक्ष परदेशी दौºयाकडे लागले आहे.

रवींद्र जडेजा (7.5/10)
साहा आणि आश्विनप्रमाणेच जडेजा फलंदाजीमध्ये फार काही करू शकला नाही. पण गोलंदाजीमध्ये मात्र, तो प्रभावी ठरला. जबरदस्त नियंत्रण राखताना त्याने फलंदाजांना फारशी संधी दिली नाही. आश्विनचा योग्य साथीदार ठरला. शिवाय, नेहमीप्रमाणे मैदानात चपळ क्षेत्ररक्षण केले.

उमेश यादव (6.5)
संघातील तीन वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत उमेश काहीसा अपयशी ठरला. पण त्याने मनापासून भेदक आणि चांगला मारा केला. तरी संघातील इतर वेगवान गोलंदाजांना स्पर्धा देण्यासाठी उमेशला सातत्याने बळी घ्यावे लागतील.

मोहम्मद शमी (8/10)
भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज असलेला शमी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याच्या शोधात असतो. पाटा खेळपट्टी असलेल्या कोटला मैदानावरही तो भेदक ठरला. स्लीप क्षेत्ररक्षकांच्या जोरावर तो ९ हून अधिक बळी घेण्यात यशस्वी ठरला.

इशांत शर्मा (7.5/10)
वेगवान गोलंदाजाच्या स्पर्धेमुळे इशांतने गेल्या मोसमातील संघातील आपले स्थान गमावले होते. परंतु, आता नव्या उत्साहाने पुनरागमन करताना त्याने जबरदस्त नियंत्रण राखले. त्याची आखूड टप्प्याची गोलंदाजी श्रीलंकन फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरली. नागपूरमध्ये इशांत खूप प्रभावी ठरला.

भुवनेश्वर कुमार (8/10)
लग्न ठरल्याने पहिल्या कसोटी सामन्यानंतर भुवीने मालिकेतून माघार घेतली. पण एका सामन्यात त्याने आपला दबदबा राखताना स्विंग माºयाच्या जोरावर ८ बळी घेतले. त्याने आपला वेगही वाढवला असून हे फलंदाजीसाठी घातक ठरणार आहे.

Web Title: Virat Kohli becomes the mantra of India's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.