‘प्रशिक्षक आपल्या आई - वडिलांप्रमाणे असतात’

प्रशिक्षक हे आपल्या आई - वडिलांप्रमाणे असतात. त्यांचे आपल्या कारकिर्दीतील योगदान विसरता कामा नये,’ असे भावनिक उद्गार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काढले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:29 AM2018-02-09T03:29:50+5:302018-02-09T03:30:04+5:30

whatsapp join usJoin us
'Trainers Are Like Their Parents' | ‘प्रशिक्षक आपल्या आई - वडिलांप्रमाणे असतात’

‘प्रशिक्षक आपल्या आई - वडिलांप्रमाणे असतात’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : प्रशिक्षक हे आपल्या आई - वडिलांप्रमाणे असतात. त्यांचे आपल्या कारकिर्दीतील योगदान विसरता कामा नये,’ असे भावनिक उद्गार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काढले. आपले प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी दिलेल्या योगदानाची आठवण सांगताना सचिनने युवा खेळाडूंना प्रशिक्षकांचा सन्मान करण्याचा संदेश दिला.
मुंबईतील वांद्रे येथील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या सचिनने म्हटले की, ‘प्रशिक्षक, गुरु आपल्या पालकांप्रमाणे असतात. कारण आपण त्यांच्यासह खूप वेळ घालवतो. त्यांच्याकडून आपण सर्व काही शिकत असतो.’ सचिनने पुढे म्हटले की, ‘मी जेव्हा क्रिकेट शिकत होतो, तेव्हा आचरेकर सर काहीवेळा कडक वागायचे. ते कधीकधी खूपच कडक वागायचे, पण त्याचवेळी ते आमची काळजीही घ्यायचे आणि तेवढेच आमच्यावर प्रेमही करायचे. सरांनी मला कधीही चांगला खेळलो असे म्हटले नाही, पण जेव्हा कधी ते मला भेळपुरी किंवा पाणीपुरी खायला घेऊन जायचे, तेव्हा मला कळायचं की ते खूश आहेत. त्यावेळी मला समजायचं की मैदानावर काहीतरी चांगलं केले आहे.’ सचिनने यावेळी लहानपणीच्या इंदुर दौºयाची आठवण सांगताना युवांना घरुन मिळणाºया स्वातंत्र्याचे महत्त्वही पटवून दिले.

Web Title: 'Trainers Are Like Their Parents'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.