तमिम इक्बालने रचला धावांचा विश्वविक्रम, सनथ जयसूर्याला टाकले मागे

बांग्लादेशचा अनुभवी आक्रमक फलंदाज तमिम इक्बाल याने तिरंगी मालिकेदरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावताना विश्वविक्रम रचला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:24 AM2018-01-24T01:24:36+5:302018-01-24T01:24:59+5:30

whatsapp join usJoin us
 Tamim Iqbal, the world record behind, runs away Sanath Jayasuriya | तमिम इक्बालने रचला धावांचा विश्वविक्रम, सनथ जयसूर्याला टाकले मागे

तमिम इक्बालने रचला धावांचा विश्वविक्रम, सनथ जयसूर्याला टाकले मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : बांग्लादेशचा अनुभवी आक्रमक फलंदाज तमिम इक्बाल याने तिरंगी मालिकेदरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावताना कोणत्याही मैदानावरील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रचला.
तमिमने झिम्बाव्बेविरुद्ध ७६ धावांची खेळी केली. यासह शेर ए बांग्ला राष्ट्रीय स्टेडियमवरील त्याच्या एकूण २,५४९ धावा झाल्या. यासह त्याने श्रीलंकेचा दिग्गज माजी फलंदाज सनथ जयसूर्याचा विश्वविक्रम मागे टाकला. जयसूर्याने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर २,५१४ धावा फटकावल्या आहेत. तमिमने शेर ए बांग्ला स्टेडियमवर एकूण ७४ सामने खेळले असून येथे त्याने ५ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.
कोणत्याही एका मैदानावर सर्वाधिक धावांचा विक्रम रचणाºया तमिम आणि जयसूर्यानंतर पाकिस्तानचा इंझमाम उल हक (२,४६४ शारजाह स्टेडियम), बांग्लादेशचा शाकिब अल हसन (२,३६९ शेर ए बांग्ला), पाकिस्तानचा सईद अन्वर (२,१७०, शारजाह) आणि बांग्लादेशचा मुशफिकर रहीम (२,१७१ शेर ए बांग्ला) यांचा क्रमांक आहे. (वृत्तसंस्था)

Web Title:  Tamim Iqbal, the world record behind, runs away Sanath Jayasuriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.