श्रीलंका आजपासून करणार दौ-याची सुरुवात

भारतात पहिल्या कसोटी विजयाची अपेक्षा बाळगून असलेल्या श्रीलंका संघाला कठोर दौºयाच्या सुरुवातीला आजपासून बोर्ड एकादशविरुद्ध दोन दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 04:06 AM2017-11-11T04:06:23+5:302017-11-11T04:06:49+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka will start from today | श्रीलंका आजपासून करणार दौ-याची सुरुवात

श्रीलंका आजपासून करणार दौ-याची सुरुवात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : भारतात पहिल्या कसोटी विजयाची अपेक्षा बाळगून असलेल्या श्रीलंका संघाला कठोर दौºयाच्या सुरुवातीला आजपासून बोर्ड एकादशविरुद्ध दोन दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे.
२००९ नंतर लंकेची भारतातील ही पहिलीच कसोटी असेल. भारतात लंकेने आतापर्यंत १७ कसोटी सामने खेळले. त्यातील दहा गमावले आणि सात सामने अनिर्णीत राहिले. कर्णधार दिनेश चांदीमलच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.तो स्वत: भारतात प्रथमच कसोटी खेळणार असून रंगना हेरथ आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्या अनुभवाचा लाभ होईल, अशी त्याला आशा आहे. घरच्या मैदानावर भारताकडून ०-९ ने पराभूत झालेला लंकेचा संघ जवळपास दोन महिन्यानंतर येथे आला आहे. दरम्यान पाकला मागच्या महिन्यात २-० ने कसोटीत पराभूत केल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसतो.
लंका संघ भारतात तीन कसोटी, तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळणार असून दौºयाची सांगता २४ डिसेंबरला मुंबईत होईल. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील बोर्ड एकादशविरुद्ध हा सामना जाधवपूर विद्यापीठ मैदानावर खेळला जाईल. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जाते.
बोर्ड एकादशमध्ये केरळ, हैदराबाद, पंजाब आणि मध्य प्रदेशातील खेळाडूंचा समावेश आहे. लंकेची आशा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू मॅथ्यूजवर असेल. पाकविरुद्ध बाहेर बसलेला मॅथ्यूज सध्या फिट आहे. कोलकाता येथे १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणाºया पहिल्या कसोटीआधी त्याला लय गाठायची आहे.
पाकविरुद्ध १६ गडी बाद करणारा अनुभवी फिरकीपटू रंगना हेरथ
आणि सहकारी लक्षण संदाकन हे देखील फॉर्ममध्ये आहेत. याशिवाय सलामीचा फलंदाज दिमूथ करुनारत्ने, चांदीमल तसेच निरोशन डिकवेला यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)

बोर्ड एकादश संघात पंजाबचा युवा फलंदाज अनमोलप्रितसिंग याला नमन ओझाऐवजी स्थान देण्यात आले. ओझा आधी कर्णधार होता पण जखमी झाल्याने तो बाहेर पडला.
पंजाबचा सलामीवीर जीवनज्योतसिंग व अभिषेक गुप्ता हे देखील संघात आहेत. फलंदाजीची जबाबदारी बी. संदीप, तन्मय अग्रवाल व रोहण प्रेम यांच्याकडे असेल.
गोलंदाजीसाठी संदीप वॉरियर, अवेश खान, जलज सक्सेना, आकाश भंडारी संघात आहेत. नरेंद्र हिरवानी संघाचे कोच असतील.

प्रतिस्पर्धी संघ

बोर्ड एकादश =- संजू सॅमसन (कर्णधार), जलज सक्सेना, जीवंज्योत सिंग, नमन ओझा, रवी किरण, अवेश खान, अभिषेक गुप्ता, रोहन प्रेम, संदीप वारीअर, आकाश भंडारी, चामा मिलिंद, तन्मय अगरवाल आणि बावनका संदीप.

श्रीलंका
दिनेश चांदीमल (कर्णधार), धनंजय डीसिल्व्हा, निरोशन डिकवेल्ला, विश्वा फर्नांडो, लाहिरु गमागे, रंगना हेराथ, दिमुथ करुणारत्ने, सुरंगा लकमल, अँजेलो मॅथ्यूज, दिलरुवान परेरा, सदीरा समराविक्रमा, लक्षन संदकन, दासुन शनाका, रोशन सिल्वा आणि लाहितु थिरिमाने.

Web Title: Sri Lanka will start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.