संगीत समारंभात अवतरला यंग धोनी

काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची कन्या पूर्णा हीच्या संगीत समारंभात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वेगळाच रूप पाहायला मिळाला. इंग्लंड दौ-यावर सफेद दाढीत दिसणारा धोनी या समारंभात युवा आणि डॅशिंग लुकमध्ये दिसला.

पूर्णा पटेल ही धोनीची पत्नी साक्षी हिची चांगली मैत्रीण आहे. पूर्णा आणि साक्षी यांना अनेकदा स्टेडियमसह अनेक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. इंग्लंड दौ-यावरून परतल्यानंतर धोनी साक्षीसह संगीत समारंभात पोहोचले.

धोनीने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा कुर्ता आणि ब्लॅक बॉटम घातली होती. यावेळी धोनीच्या चेह-यावरील सफेद दाढीही गायब होती.

धोनी आणि साक्षी यांच्यासोबत जिवाही या समारंभात आकर्षणाच्या केंद्रस्थानी होती.

इंग्लंड दौ-यावर धोनीच्या कामगिरीवर टीका करण्यात आली. भारताने इंग्लंडविरूद्धची टी-20 मालिका जिंकली, परंतु वन डे मालिकेत त्यांना पराभव पत्करावा लागला.