मुंबईचा सलग तिसरा पराभव

मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार स्वीकारताना स्टीव्हन स्मिथ.

मॅक्झिमम सिक्सेसचा पुरस्कार केरॉन पोलॉर्डला मिळाला.

स्टीव्हन स्मिथने राजस्थान रॉयल्सला विजयी करताना नाबाद 79 धावांची खेळी केली.

मुंबईकर अजिंक्य रहाणेने 39 चेंडूंमध्ये 47 धावा ठोकत राजस्थानच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडली.

संजू सॅमसनला बाद करत राजस्थान रॉयल्सला सुरुवातीलाच दणका दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना मुंबई इंडियन्सचा गोलंदाज विनयकुमार.

पोलार्डने चौकार षटकारांची आतषबाजी करत 34 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या आणि मुंबईला 164 धावांचा पल्ला गाठून दिला.

दहाव्या षटकापर्यंत मुंबईची ३ बाद ४५ अशी संकटमय स्थिती झाली असताना कोरी अँडरसन आणि केरॉन पोलार्ड यांची मैदानावर जोडी जमली. दोघांनी मग राजस्थानी मेजवानीचा समाचार घेतला. कोरीने अर्धशतक झळकावले.

मुंबई इंडियन्स टीमचे मालक नीता अंबानी व त्यांचा मुलगा आकाश अंबानी सामना बघायला आले खरे परंतु त्यांना मुंबईचा सलग तिसरा पराभव बघायला लागला.