IPL मधील मॅन ऑफ द मॅचचे किंग

अमित मिश्रा फलंदाजांचे वर्चस्व मोडून अमित मिश्रा या गोलंदाजांने आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत तब्बल ८ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. अमितने ९० सामन्यांमध्ये १०६ विकेट्स घेतल्या आहेत.

शेन वॉटसन राजस्थान रॉयल्सच कर्णधार शॉन वॉटसन हा आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा दुसरा अष्टपैलू खेळाडू. दोन हजारहून अधिक धावा व ५५ विकेट घेणा-या वॉटसनने ८ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.

अजिंक्य रहाणे भारतीय संघातील विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखळा जाणारा अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये ७२ सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये सामनावीर ठरला आहे. अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सचा आधारस्तंभच बनला आहे.

गौतम गंभीर सेहवागप्रमाणेच गौतम गंभीरही भारतीय संघातून बाहेर फेकला गेला असला तरी या दिल्लीकर खेळाडूने आयपीएल चांगलेच गाजवले आहे. कोलकाताचा कर्णधार असलेल्या गौतम गंभीर १० वेळा सामनावीर ठरला आहे. गंभीरने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत २९०० हून अधिक धावा केल्या आहेत.

वीरेंद्र सेहवाग आयपीएलमध्ये सध्या पंजाबकडून खेळणा-या वीरेंद्र सेहवाग आता भारतीय संघात नाही. मात्र आयपीएलमध्ये विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. सेहवागने आत्तापर्यंत 11 सामन्यांमध्ये दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे

महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्येही त्याची छाप पाडली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेल्या धोनीने 11 वेळा सामनीवाराचा पुरस्कार पटकावला आहे. त्याने आयपीएलमध्ये अडीच हजारहून अधिक धावा केल्या आहेत.

माइक हसी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज माइक हसी आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गणला जातो. चेन्नईकडून खेळणा-या हसीने 12 वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे. हसीने 55 सामन्यात 1900 धावा केल्या आहेत.

युसूफ पठाण सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा युसूफ पठाण हा भारताकडून खेळताना फारसा प्रभावी ठरला नाही तरी आयपीएलमध्ये त्याचा बोलबाला आहे. युसूफ आत्तापर्यंत 14 वेळा सामनावीर ठरला आहे. युसूफने 109 सामन्यांमध्ये 2133 धावा व 40 विकेट घेत अष्टपैलू कामगिरी केली आहे.

ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा सलामीवीर व धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आयपीएलमध्ये सर्वाधिक म्हणजेच तब्बल 16 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू ठरला आहे. आत्तापर्यंत 70 सामने खेळलेल्या ख्रिस गेलने 2825 धावा केल्या आहेत.

भारतीय क्रिकेटच्या चेहरामोहरा बदलणा-या आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करुन खेळणा-या खेळाडूंची चलती असते. ख्रिस गेल युसूफ पठाण यासारख्या बिग हिटर्सचाच आयपीएलमध्ये बोलबाला दिसून येतो. आत्तापर्यंत पार पडलेल्या आयपीएलच्या आठ हंगामांमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणा-या खेळाडूंचा घेतलेला हा आढावा...