IPL Spot Fixing Timeline

११ जून २०१३ - श्रीसंत व अंकित चव्हाण तिहार जेलमधून जामिनावर बाहेर.

३० जुलै २०१३ - बीसीसीआयची चौकशी समिती बेकायदेशीर असल्याचा व नव्याने चौकशी करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश.

५ ऑगस्ट २०१३ - मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात बीसीसीआयची सुप्रीम कोर्टात धाव.

१३ सप्टेंबर २०१३ - बीसीसीआयची श्रीसंत व अंकित चव्हाण दोघांवर आजीवन बंदी अमित सिंगला पाच वर्षांची बंदी तर सिद्धार्थ त्रिवेदीला एका वर्षाची बंदी.

२९ सप्टेंबर २०१३ - बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून एन. श्रीनिवासन यांची पुन्हा निवड करण्यात आली.

८ ऑक्टोबर २०१३ - बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम पाहण्यास श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाची परवानगी. अर्थात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची स्वतंत्र चौकशी न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल असा स्पष्ट निर्देश.

२७ मार्च २०१४ - सुप्रीम कोर्टाच्या सुचनेवरून सुनील गावस्कर यांची आयपीएल-७चे हंगामी प्रमुख म्हणून नियुक्ती.

१० फेब्रुवारी २०१४ - गुरुनाथ मेयप्पन याचा बेटिंगशी संबंध होता या आरोपावर मुदगल समितीचे शिक्कामोर्तब.

२१ सप्टेंबर २०१३ - गुरुनाथ मेयप्पनवर फसवणूक बनावट कागदपत्रे बनवणे आणि कट रचल्याचे तसेच बेटिंग केल्याचे आरोप निश्चित करण्यात आले.

३ नोव्हेंबर २०१४ - मुदगल समितीचा अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टाला सादर.

२२ जानेवारी २०१५ - सुप्रीम कोर्टाचा दणका - मेयप्पन व राज कुंद्रा बेटिंगमध्ये दोषी श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्सचं भवितव्य अधांतरी

५ जून २०१३ - राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राची पोलीसांकडून चौकशी.

४ जून २०१३ - मेयप्पन विंदू दारा सिंग व सहा बुकींना जामीन मंजूर.

२ जून २०१३ - श्रीनिवासन पदावरून दूर जगमोहन दालमिया यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती.

१ जून २०१३ आयपीएल चेअरमनपदाचा राजीव शुक्ला यांचा राजीनामा.

३१ मे २०१३ - राजीनामा देण्याची मागणी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांनी धुडकावल्यामुळे संजय जगदाळे व अजय शिर्के यांचा आपापल्या पदांचा राजीनामा.

२५ मे २०१३ - सुपर किंग्जचे मालक असलेल्या इंडिया सीमेंट्सकडून मेयप्पनचा व्यवस्थापनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा.

२४ मे २०१३ - गुरुनाथ मेयप्पनला अटक.

२३ मे २०१३ - चेन्नई सुपर किंग्जचा पदाधिकारी व श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन व पाकिस्तानचा अंपायर असद रौफ यांची चौकशी.

२१ मे २०१३ - विंदू दारा सिंगला बुकींसोबत संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक.

१९ मे ३०१३ - आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे चौकशीचे आदेश.

१७ मे २०१३ - राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू व बुकी अमित सिंग पोलीसांच्या ताब्यात. श्रीसंत चंडीला अंकित व अमित बीसीसीआयकड़ून निलंबित.

१६ मे २०१३ - राजस्थान रॉयल्सचे खेळाडू एस. श्रीसंत अजित चंडीला व अंकित चव्हाणला दिल्ली पोलीसांनी केले अटक.