भारताचा दारूण पराभव

अरॉन फिंचविरोधात पायचीतचे अपील करताना रविंद्र जाडेजा.

आघाडीला येऊन ८१ धावा करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून देणा-या अरॉन फिंचला उमेश यादवने बाद केले. यादवने ९ षटकांत ७२ धावा देत ४ गडी बाद केले.

अत्यंत आक्रमक व धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला बाद केल्यानंतर आश्विनचं कौतुक करताना रोहित शर्मा व सुरेश रैना.

मायकेल क्लार्कला तंबूत धाडल्यावर मोहित शर्माचे अभिनंदन करताना सुरेश शर्मा.

ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव स्मिथने शतक झळकावले आणि भारताला विजयासाठी ३२९ धावांचा डोंगर उभा केला.

शेन वॉटसनने २८ धावांची खेळी करताना कांगारूंचा डाव कोसळणार नाही याची दक्षता घेतली. अश्विनला मिडविकेटच्या डोक्यावरून सिक्स मारताना वॅटसन.

शेवटी भारतीय गोलंदाजांची विशेषत: मोहीत शर्माची धुलाई झाली त्यात मिशेल जॉन्सननेही एक चौकार मारून हात धुवून घेतले.

विकेट किपर हॅडिनने शिखर धवनचा झेल सोडला. अर्थात हा झेल फारसा महागात पडला नाही कारण धवन ४५ धावा करून तंबूत परतला.

हुकचा चांगला फटका खेळताना शिखर धवन.

सुरुवातीला संयमी खेळी करणा-या रोहित शर्माने चांगले फटके खेळून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.

रोहित शर्माची अत्यंत महत्त्वाची विकेट मिशेल जॉन्सनने त्रिफळाचीत करून घेतली आणि असा जल्लोष केला. रोहीतने ४८ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या.

मोठी खेळी करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेला रोहीत जॉन्सनच्या चांगल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर निराश होत परतला.

शिखर धवनचा झेल डीप मिडविकेटला पकडताना ग्लेन मॅक्सवेल.

खास मैत्रिण अनुष्का शर्मा सेमीफायनल बघण्यासाठी सिडनीला पोचली खरी परंतु विराट मात्र अवघी एक धाव करून निराश होत तंबूत परतला. एक अत्यंत खराब फटका खेळून कोहली बाद झाला.

अत्यंत धोकादायक असलेली व अजिबात आवश्यकता नसलेली एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रविंद्र जाडेजा धावबाद झाला.

महेंद्रसिंग ढोणीने ६५ धावांची खेळी केली परंतु कांगारूंच्या ३२९ धावांच्या लक्ष्यासमोर ती किरकोळ ठरली. एक चांगला फटका मारताना ढोणी.

महेंद्रसिंग ढोणी धावबाद झाला आणि भारत हरणार यावर शिक्कामोर्तब झाले.

स्टार्कच्या एका बाहेर जाणा-या चेंडूशी छेडछाड करणं अजिंक्य रहाणेला महागात पडलं आणि विकेटकिपरकडे झेल देत तो बाद झाला. सामना जिंकून देण्याची संधी वाया घालवल्यानंतर बाद झाल्यावर तंबूत परतणा-या रहाणेनं ४४ धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये भारताचा ९५ धावांनी दणदणीत पराभव केला आणि त्यांच्या जल्लोषाला उधाण आले. कांगारूंनी विजयासाठी ३२९ धावांचे आव्हान ठेवले परंतु भारताचे दहा फलंदाज ४६.५ षटकांमध्ये २३३ धावा करून तंबूत परतले.