भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी

तळाचे फलंदाज पटापट बाद झाल्याने भारताला ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला.

मुरली विजयही शतकाच्या अगदी जवळ होता. मात्र ९९ धावांवर असताना लिऑनच्या चेंडूवर तो पायचीत झाला.

मुरली विजय (९९) व विराट कोहली (नाबाद १२७) यांची शानदार खेळ करत भारताला विजयाच्या समीप नेले. कर्णधार म्हणून पदार्पण करणा-या कोहलीने या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकली.

दुस-या डावातही वॉर्नरने १०२ तर स्मिथने ५२ धावांची खेळी करत भारतासमोर जिंकण्यासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवले.

पहिल्या डावादरम्यान मिशेल जॉन्सनचा बाऊंसर विराटच्या डोक्यावर आदळला आणि सर्वांच्या मनात नुकताच मृत्यूमुखी पडलेल्या फिल ह्युजची आठवण ताजी झाली. एरवी आक्रमक खेळ करणा-या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनीही विराटची आपुलकीने चौकशी केली.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने (११५) पुजारा (७३) व रहाणे (६२) यांच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा पाठलाग केला. मात्र भारताचा पहिला डाव ४४४ धावांवर संपुष्टात आल्याने ऑस्ट्रेलियाला ७३ धावांची आघाडी मिळाली.

दुखापतग्रस्त कर्णधार मायकेल क्लार्कनेही पहिल्या डावात १२८ धावांची शानदार खेळी केली. मात्र त्याचे दुखणे बळावल्याने तो डाव अर्धवट सोडून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ५१७ धावांवर घोषित केला.

डेव्हिड वॉर्नरने पहिल्या डावात (१४५) केलेल्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला चांगली धावसंख्या उभारता आली. तर स्मिथनेही पहिल्या डावात नाबाद १६२ धावा केल्या.

बाऊंसर लागून मृत्यूमुखी पडलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्युजला कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघानी आदरांजली वाहिली.

नॅथन लिऑनने पहिल्या डावात ५ तर दुस-या डावात भारताचे ७ गडी टिपत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. त्याला मॅन ऑफ दि मॅच पुरस्कार देण्यात आला.

अ‍ॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगलेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या १४१ धावांच्या शानदार खेळीनंतरही भारत ४८ धावांनी पराभूत झाला. भारतासमोर जिंकण्यासाठी ३६४ धावांचे आव्हान होते मात्र भारताचे सर्व गडी ३१६ धावांत बाद झाले.