कॅप्टन्स ऑफ IPL-8

सर्वाधिक चर्चिला जाणारा भारतीय खेळाडू विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संघ आयपीएलमध्ये मैदानात उतरेल. २००८ साली अंडर-१९ वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीला आयपीएलमध्ये स्थान मिळाले. विराटने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १०७ सामने खेळले असून त्याच्या नावावर २६३२ धावा आहेत.

प्रथम श्रेणीचे सामने न खेळता थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात स्थान मिळविणारा डेव्हिड वॉर्नर हा एकमेव खेळाडू. २००९ साली आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वॉर्नर हा आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो आता सनरायर्झस हैदराबादचे नेतृत्व करताना दिसणार आहे. वॉर्नरने ६९ सामने खेळले असून त्याने १९६३ धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका संघाचा डावखुरा फलंदाज जेपी ड्यूमिनी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नेत्तृत्व करताना पाहायला मिळेल. जेपी याआधी मुंबई इंडियन्स डेक्कन चार्जस संघाकडून खेळताना दिसला आहे. जेपीन आत्तापर्यंत ५३ सामने खेळले असून त्याच्या नावावर ४१० धावा व ३ विकेट आहेत.

ऑस्ट्रेलियाचा ऑल राउंडर क्रिकेटर शेन वॉटसनने २००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून तो खेळताना दिसणार आहे. शेन वॉटसनने आत्तापर्यंत ६८ सामने खेळले असून त्याच्या नावावर २०२५ धावा व ७ विकेट आहेत.

आयपीएलमध्ये केवळ २१ सामने खेळणारा जॉर्ज बेली हा किंग्ज इलेवन पंजाबचा कर्णधार आहे. जॉर्ज बेली याआधी २००९ साली चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसला होता. बेलीच्या नावावर सर्वात कमी ३२० धावा आहेत.

वन-डे सामन्यात दुहेरी शतक झळकाविणारा रोहित शर्मा आयपीएलमध्ये डेक्कन चार्जसकडून खेळत होता. २०११ साली तो मुंबई इंडियन्सच्या संघात सामिल झाला. २०१३ साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळाले होते. रोहितने आयपीएलमध्ये ११२ सामने खेळले असून २९०३ धावा केल्या आहेत.

वन-डे सामन्यात दुहेरी शतक झळकाविणारा रोहित शर्मा आयपीएलमध्ये डेक्कन चार्जसकडून खेळत होता. २०११ साली तो मुंबई इंडियन्सच्या संघात सामिल झाला. २०१३ साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळाले होते. रोहितने आयपीएलमध्ये ११२ सामने खेळले असून २९०३ धावा केल्या आहेत.

भारताचा क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असून धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला २०१० व २०११ साली दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळाले आहे. धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ११२ सामने खेळले असून २६१५ धावा केल्या आहेत.