कॅप्टन कूल धोनीचा Successfull प्रवास

कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर धोनी आता वन डे आणि टी - २० सामन्यांमध्येच खेळणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीनंतर विराट कोहलीची कर्णधारपदावर वर्णी लागेल अशी शक्यता आहे. आता धोनीच्या नेतृत्वाखाली भारत पुन्हा एकदा विश्वचषक पटकावते हे आगामी वर्षात समजेल.

विकेटकिपर म्हणून धोनीने विश्वविक्रम रचला आहे. धोनीने वन डे टी -२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण ३०९ वेळा यष्टीचित केले असून त्याच्या पाठोपाठ श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा क्रमांक लागतो.

कसोटी क्रिकेटमधील ९० सामन्यांमध्ये धोनीने ३८. ०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. यामध्ये सहा शतकं आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून खेळताना धोनीने ३४५४ धावा केल्या असून तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. यापूर्वी सुनील गावस्करने ३४४९ धावा मोहम्मद अझरुद्दीन २८५६ व सौरव गांगुलीने २५६१ धावा केल्या होत्या.

परदेश दौ-यांमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. परदेशात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या ३० पैकी अवघ्या ६ सामन्यांमध्येच भारताला विजय मिळाला होता. २०११ मध्ये इंग्लंड २०११ -१२ मध्ये ऑस्ट्रेलिया २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि चालू वर्षात न्यूझीलंड इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौ-यातील कसोटी मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला.

कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने ६० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यातील २७ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला तर १८ सामन्यांमध्ये पराभव झाला. १५ सामने अनिर्णित राहिले.

२००७ मध्ये भारताच्या एकदिवसीय संघाची तर २००८ मध्ये कसोटी संघाची धूरा धोनीकडे सोपवण्यात आली. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने वनडे आणि टी -२० अशा दोन्ही प्रकारांमध्ये विश्वचषकावर नाव कोरले आहे.

पदार्पणाच्या वर्षातच तडाखेबाज शतक ठोकून धोनीने क्रिकेटविश्वात स्वत:ची छाप पाडली. धोनीचा हेलिकॉप्टर शॉट आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे.

फुटबॉल प्रशिक्षकांनी धोनीला क्रिकेट खेळण्यासाठी स्थानिक स्पर्धेमध्ये पाठवले आणि तिथून धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. राष्ट्रीय स्पर्धांमधील चमकदार कामगिरीनंतर २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय वनडे आणि २००५ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने पदार्पण केले.

झारखंडमधील रांची या शहरात ७ जुलै १९८१ रोजी धोनीचा जन्म झाला. शालेय जीवनात फुटबॉलमध्ये गोलकिपर म्हणून मैदानात उतरणारा धोनी हा क्रिकेटमध्ये येणारच नव्हता.

ऑस्ट्रेलिया दौ-यातील कसोटी मालिका गमावल्यावर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे. रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेल्या धोनीने भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नाव कमावले. धोनीच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...