बॉलिवूडमधील घटस्फोट

पूजा भट - मनिष मखिजा : दिल है की मानता नही सडक जख्म डॅडी आणि सर या चित्रपटांमधील भूमिकांमुळे नावाजली गेलेली अभिनेत्री पूजा भट हिने दिग्दर्शक मनिष मखीजाशी २००३ साली लग्न केले. मात्र ११ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी ट्विटरच्या माध्यमातून पूजा भटने हा निर्णय जाहीर केला.

करिश्मा कपूर - संजय कपूर : अभिनेता अभिषेक बच्चनशी ठरलेले लग्न मोडून आधीच घटस्फोटित असलेल्या संजय कपूरशी लग्न करण्याच्या करिश्माच्या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र दोन मुलांच्या जन्मानंतर संजय व करिश्मामध्ये खटके उडू लागल्याच्या बातम्या येऊ लागल्या. बराच काळ करिश्मा दिल्लीत पतीसोबत न राहता मुंबईत पालकांसमोर राहत होती. अखेर त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून पेपर्स साईन केले आहेत.

कमल हसन - सारिका : लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिकाने १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.

करण सिंग ग्रोव्हर - जेनिफर विंगेट : टीव्ही इंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय जोडी असलेल्या करण व जेनिफरच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ट्विटरवरून करणने हा निर्णय जाहीर केला. जेनिफरशी लग्न करण्यापूर्वी करणने अभिनेत्री श्रद्धा निगमशी लग्न केले होते मात्र २००९ साली ते दोघे वेगळे झाले होते.

चित्रांगदा सिंग - ज्योती रांधवा : एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी चित्रांगदा सिंग गोल्फपटू ज्योती रांधवा याच्याशी १३ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाली होती. मात्र गेल्या वर्षी त्यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे वृत्त प्रसारित होऊ लागले आणि नुकताच त्यांना घटस्फोट मंजूर करण्यात आला.

सैफ अली खान - अमृता सिंग : वयातील मोठे अंतर आणि वेगळा धर्म यामुळे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लव्हस्टोरीत अनेक अडचणी आल्या. मात्र त्या सर्वांवर मात करत सैफ आणि अमृताने एकमेकांशी लग्न केले. सैफच्या पालकांचा या लग्नाला नेहमीच विरोध होता तरीही त्यांनी त्यांचे नाते टिकवून ठेवले.अखेर १३ वर्षांनंतर सैफ आणि अमृताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सैफची अनेक प्रेमप्रकरणे झाली. सध्या तो अभिनेत्री करीना कपूरशी विवाहबद्ध आहे.

संजय दत्त - रेहा पिल्ले : अभिनेता संजयचे दत्तचे अभिनेत्री रिचा शर्माशी लग्न झाले होते मात्र मुलगी त्रिशलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी डिव्होर्स घेतला. त्यानंतर संजयने १४ फेब्रुवारी १९९९ मध्ये रेहाशी लग्न केले. आयुष्यातील अनेक कठिण प्रसंगात रिहा संजयच्या पाठिशी खंबीरपणे उभी होती मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. संजयची कॅसनोव्हा इमेज आणि त्याचे व्यस्त वेळापत्रक यामुळे संजय व रिहामध्ये दुरावा निर्माण झाला. रिहाची टेनिसस्टार लिएँडर पेसशी वाढती जवळीक हेही त्यांच्या वेगळं होण्याचे कारण मानले जाते.

आमिर खान - रीना दत्ता: बॉलिवूडचा चॉकलेट हिरो मानल्या जाणा-या आमिर खानने चित्रपटसृष्टीत एन्ट्री करण्यापूर्वीच त्याची प्रेयसी रीनाशी गुपचुप लग्न केले होते. १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आमिरने रीनापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २००२ साली त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतरही आमिर व रीना एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यानंतर आमिरने २००५ साली किरण रावशी लग्न केले.

अनुराग कश्यप - कल्की कोचलिन : २००९ साली आलेल्या देव डी या चित्रपटात काम करताना अनुराग आणि कल्की एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २००१ साली एका खासगी समारंभात ते लग्नगाठीत अडकले. मात्र थोड्याच दिवसांत त्यांचे पटत नसल्याच्या खटके उडू लागल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अखेर २०१३ साली अनुरागने आपण व कल्की वेगळे होत असल्याची घोषणा केली. अनुरागचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगीही आहे.

हृतिक रोशन - सुझान खान : बॉलिवूडमधील ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान हे दोघेही मोस्ट अ‍ॅडोरेबल कपल मानले जायचे. त्यामुळे ते वेगळ होत असल्याची बातमी ही सगळ्यांसाठी अतिशय धक्कादायक होती. १८ वर्षांपासून एकत्र असलेल्या हृतिक व सुझान यांनी गेल्या वर्षी वेगळ होण्याचा निर्णय जाहीर केला आणि अखेर १ नोव्हेंबर २०१४ रोजी वांद्रे कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केला.