कोहलीला वन-डे सामन्यांत विश्रांती, श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी व मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर

भारतीय कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे; पण तो नवी दिल्ली येथे खेळल्या जाणा-या तिस-या कसोटीत खेळणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:22 AM2017-11-28T02:22:35+5:302017-11-28T02:22:51+5:30

whatsapp join usJoin us
 Virat Kohli for ODI series against Sri Lanka, third Test against Sri Lanka | कोहलीला वन-डे सामन्यांत विश्रांती, श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी व मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर

कोहलीला वन-डे सामन्यांत विश्रांती, श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी व मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : भारतीय कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे; पण तो नवी दिल्ली येथे खेळल्या जाणा-या तिस-या कसोटीत खेळणार आहे.
पुढील महिन्यात मायदेशात खेळल्या जाणा-या वन-डे मालिकेत कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहलीला वन-डे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.’
भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यानंतर धरमशाला येथे १० डिसेंबरपासून तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. वनडे मालिकेसाठी पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे.
तिसरा व अखेरचा कसोटी सामना २ डिसेंबरपासून दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.

भारत संघ :
तिसरी कसोटी :-
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धीमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा व विजय शंकर.

वन-डे मालिका :- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर
कुमार व सिद्धार्थ कौल.

Web Title:  Virat Kohli for ODI series against Sri Lanka, third Test against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.