विराटची पुन्हा एक शानदार खेळी

लक्ष्याचा पाठलाग करण्यात मास्टर असलेल्या विराट कोहलीने पुन्हा एकदा भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध किंग्समेड डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत विजय मिळवून दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 05:30 AM2018-02-04T05:30:51+5:302018-02-04T05:31:05+5:30

whatsapp join usJoin us
Virat is again a great knock | विराटची पुन्हा एक शानदार खेळी

विराटची पुन्हा एक शानदार खेळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर लिहितात...

लक्ष्याचा पाठलाग करण्यात मास्टर असलेल्या विराट कोहलीने पुन्हा एकदा भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध किंग्समेड डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत विजय मिळवून दिला. लक्ष्य सोपे नव्हते. दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करीत सन्मानजनक धावसंख्या उभारली असली तरी कदाचित त्यांना अपेक्षेपेक्षा ३० धावा कमी पडल्या. भारतीय फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येला लगाम घातला. यजमान संघाला डिव्हिलियर्सची उणीव भासली. डिव्हिलियर्ससारखा खेळाडू संघात असता तर दक्षिण आफ्रिकेला ३०० पर्यंत मजल मारण्याची संधी होती. किंग्समेडची खेळपट्टी संथ होती. त्यावर चेंडूला अधिक उसळी मिळत नव्हती. मनगटाच्या जोरावर चेंडू वळविणाºया भारतीय फिरकीपटूंनी परिस्थितीचा चांगला लाभ घेतला. हे दोन्ही फिरकीपटू चेंडूला उंची देण्यास घाबरत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एखादा आक्रमक फटका खेळला जातो, पण अनेकदा बळी घेण्याची संधी असते.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्युप्लेसिसने शानदार शतकी खेळी केली. एकवेळ ड्युप्लेसिस सामना भारतापासून हिसकावून नेईल, असे वाटत होते. ख्रिस मॉरिसचा अपवाद वगळता तळाच्या फलंदाजांकडून ड्युप्लेसिसला योग्य साथ मिळाली नाही. त्यामुळे ड्युप्लेसिसला मोठे फटके मारण्याची संधी मिळाली नाही. डर्बनच्या खेळपट्टीवर कृत्रिम प्रकाशझोतात चेंडू वेगाने येतो, असे बोलले जाते आणि रोहित शर्मा व शिखर धवन या भारतीय सलामी जोडीला तेच आवडते. रोहित व शिखरने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित उंचावरुन फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर धवन व कोहली जोडीने डाव सावरला. धवन मोठी खेळी करणार असे वाटत होते. कोहलीने अशक्यप्राय धाव घेण्यासाठी दिलेल्या ‘कॉल’वर धवन धावबाद झाला.
धवनला धावबाद केल्यामुळे अतिरिक्त जबाबदारी आली असल्याचे त्यानंतर कोहलीच्या फटक्यातून दिसून येत होते. कोहलीच्या फलंदाजीमध्ये एवढी सहजता असते की, त्यामुळे गोलंदाजांना कुठलीही संधी मिळत नाही. कोहलीला कव्हर ड्राईव्हचा फटका खेळताना बघणे नेत्रसुखद अनुभव असतो. रहाणेने वाँडरर्स कसोटीतील फॉर्म कायम राखत शानदार फलंदाजी केली आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला वगळणे मोठी चूक असल्याचे सिद्ध केले. त्यानेही सहज सुंदर फलंदाजी केली. कोहली-रहाणे जोडी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे पिसे विखुरताना बघितल्यानंतर आनंद झाला.
डर्बनच्या तुलनेत सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान आहे. त्याचसोबत हा सामना दिवसा खेळला जाणार आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या माºयाची चांगली कल्पना असून ते यजमान संघाला मालिकेत पुनरागमन करण्याची संधी देणार नाहीत. (पीएमजी)

Web Title: Virat is again a great knock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.