सनरायझर्सचा विजयाचा निर्धार, बेंगळुरूविरुद्ध आज लढत

कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवित गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक पक्के करण्यास उत्सुक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:25 AM2018-05-07T01:25:41+5:302018-05-07T01:25:41+5:30

whatsapp join usJoin us
 Sunrisers are determined to win | सनरायझर्सचा विजयाचा निर्धार, बेंगळुरूविरुद्ध आज लढत

सनरायझर्सचा विजयाचा निर्धार, बेंगळुरूविरुद्ध आज लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद - कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवित गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक पक्के करण्यास उत्सुक आहे.
आपल्या दमदार माऱ्याच्या जोरावर सनरायझर्सने आतापर्यंत कमी धावसंख्येचाही चांगल्या प्रकारे बचाव केला आहे. शनिवारी त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीतही विजय खेचून आणण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे.
सनरायझर्सने आतापर्यंत ९ पैकी ७ सामन्यांत विजय मिळवत १४ गुणांसह प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली आहे, पण अद्याप त्यांच्यासाठी काही बाबी स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात अडचणीच्या ठरू शकतात. त्यात सलामीवीर शिखर धवनचा कमी स्ट्राईक रेट आणि मधल्या फळीतील फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखण्यात आलेले अपयश आदींचा समावेश आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघासाठी आता प्रत्येक लढत ‘करा अथवा मरा’ अशा धर्तीची आहे. त्यांना प्रत्येक लढत जिंकण्यासोबतच अन्य लढतींचे निकालही अनुकूल लागावे, यासाठी प्रार्थना करावी लागेल. ९ पैकी त्यांना केवळ तीन सामने जिंकता आले. त्यांच्या खात्यावर ६ गुणांची नोंद आहे.
दुसºया बाजूचा विचार करता सनरायझर्सतर्फे आतापर्यंत फिरकीपटू राशिद खान, वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा आणि अष्टपैलू शाकिब-अल-हसन प्रभावी ठरले आहेत. फलंदाजीमध्ये कर्णधार विलियम्सनने शानदार कामगिरी केली. गेल्या लढतीत धवनच्या साथीने डावाची सुरुवात करणाºया अ‍ॅलेक्स हेल्सकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.
(वृत्तसंस्था)

कोहली आणि डिव्हिलियर्स सोमवारच्या लढतीत सनरायझर्सपुढे अडचण निर्माण करू शकतात. भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनामुळे सनरायजर्स संघाची गोलंदाजीची बाजू अधिक मजबूत झाली आहे. आरसीबीच्या गोलंदाजीचा विचार करता डेथ ओव्हर्सची गोलंदाजी त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. उमेश यादव व यजुवेंद्र चहल यांनी चांगला मारा केला, पण हैदराबादचा निवासी असलेला मोहम्मद सिराज व वाशिंग्टन सुंदर यांनाही सनरायझर्सविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी करावी लागेल.

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता

स्थळ : राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद
 

Web Title:  Sunrisers are determined to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.